राजा शिवछत्रपती येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 11:13 AM2017-02-17T11:13:15+5:302017-02-17T16:43:15+5:30

राजा शिवछत्रपती ही मालिका सात ते आठ वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर दाखवण्यात आली होती. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हेने साकारलेल्या ...

King Shiv Chhatrapati visits again to meet the audience | राजा शिवछत्रपती येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

राजा शिवछत्रपती येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
जा शिवछत्रपती ही मालिका सात ते आठ वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर दाखवण्यात आली होती. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हेने साकारलेल्या शिवाजी महाराज यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या मालिकेने खऱ्या अर्थाने डॉ. अमोल कोल्हेला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेने शिवाजी महाराजांचा इतिहास खूपच चांगल्याप्रकारे मांडला होता. ही मालिका संपून आज इतकी वर्षं झाली असली तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. 
राज शिवछत्रपती या मालिकेची लोकप्रियता पाहाता ही मालिका आता पुन्हा दाखवली जात आहे. ही मालिका पुन्हा सुरू होत असल्याची बातमी सोशल माडियाच्या मार्फत सध्या चांगलीच पसरली आहे. आपली आवडती मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे याचा आनंद त्यांना होत आहे. सोशल मीडियाला त्याबाबत ते प्रतिक्रियादेखील देत आहेत. ही मालिका पुन्हा दाखवत असल्याचा आनंद प्रेक्षकांसोबतच या मालिकेतील कलाकारांनादेखील होत आहे. शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता अमोल कोल्हे सांगतो, "ही मालिका संपून आता जवळजवळ आठ वर्षं झाली आहेत. ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. ही मालिका पुन्हा दाखवली जात असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या मालिकेचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे." तर या मालिकेत जिजाऊची भूमिका साकारलेल्या मृणाल कुलकर्णी सांगतात, "ही मालिका माझ्यासाठी संस्मरणीय आहे." 
मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळायला लागल्या आहेत. ही मालिका इतिहासाच्या भव्यतेचा प्रत्यय देणार असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या मालिकेमुळे शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला असल्याचेही अनेकजण सांगतात. 

Web Title: King Shiv Chhatrapati visits again to meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.