'भारतात मुस्लीम आहे म्हणून..'; किरण मानेंची मार्मिक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 02:56 PM2023-09-03T14:56:15+5:302023-09-03T14:56:43+5:30

Kiran mane: सध्या सोशल मीडियावर किरण माने यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक मीम शेअर केलं आहे.

kiran-mane-facebook-post-actor-shared-meme-saying-as-there-are-muslims-in-india-there-are-hindus | 'भारतात मुस्लीम आहे म्हणून..'; किरण मानेंची मार्मिक पोस्ट चर्चेत

'भारतात मुस्लीम आहे म्हणून..'; किरण मानेंची मार्मिक पोस्ट चर्चेत

googlenewsNext

'मुलगी झाली हो', 'बिग बॉस मराठी ४' अशा गाजलेल्या मालिका, शोमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे किरण माने. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे किरण माने कायम चर्चेत येत असतात. किरण माने कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे समाजात वा इंडस्ट्रीमध्ये कोणतीही गोष्ट घडली की त्यावर ते व्यक्त होत असतात. यावेळीही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या सोशल मीडियावर किरण माने यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक मीम शेअर केलं आहे. मात्र, या मीमची चांगलीच चर्चा रंगली आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर 'द डार्क नाइट' या सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये पोलीस स्टेशनमध्ये बॅटमॅन आणि जोकर यांचं संभाषण सुरु आहे. या फोटोवर एक मराठी वाक्य एडीट करुन मीम तयार करण्यात आलं आहे. , 'पुन्हा एकदा सांगतो लक्षात घे, भारतात मुस्लीम आहे म्हणून तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार', असं वाक्य या फोटोवर एडीट केलेलं आहे. हे मीम किरण माने यांनी शेअर केले आहे. सोबतच '...हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा,' असं कॅप्शन किरण माने यांनी हा फोटो शेअर करत दिलं आहे.

दरम्यान, किरण माने यांनी शेअर केलेलं हे मीम आता व्हायरल होत असून त्यांच्या पोस्ट खाली नेटकऱ्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी हे मीम वैचारिक आणि वास्तववादी असल्याचं म्हटलं आहे. तर, काहींनी माने यांच्यावर टीकाही केली आहे. सध्या किरण माने 'सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेत सिंधूताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारत आहेत.
 

Web Title: kiran-mane-facebook-post-actor-shared-meme-saying-as-there-are-muslims-in-india-there-are-hindus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.