"तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते", नव्या मालिकेत किरण माने साकारणार खलनायक, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:53 AM2024-06-28T11:53:52+5:302024-06-28T11:54:20+5:30

नवी मालिका आणि नव्या भूमिकेतून किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तिकळी' असं किरण मानेंच्या नव्या मालिकेचं नाव असून त्याचा प्रोमो समोर आला आहे.

kiran mane new marathi serial tikali to play negative role promo release | "तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते", नव्या मालिकेत किरण माने साकारणार खलनायक, प्रोमो समोर

"तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते", नव्या मालिकेत किरण माने साकारणार खलनायक, प्रोमो समोर

किरण माने हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे ते चर्चेत आले होते. 'मुलगी झाली हो' या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'पिंपळपान', 'भेटी लागी जीवा', 'सिंधुताई माझी माई' या मालिकांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. आता पुन्हा एकदा ते टेलिव्हिजनवरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नवी मालिका आणि नव्या भूमिकेतून किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तिकळी' असं किरण मानेंच्या नव्या मालिकेचं नाव असून त्याचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत किरण माने खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये मानेंचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. किरण मानेंना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

'तिकळी' ही मालिका सन मराठीवर सुरू होणार आहे. १ जुलैपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम पूजा ठोंबरे आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर अभिनेता पार्थ घाटगे तिकळी मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: kiran mane new marathi serial tikali to play negative role promo release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.