Kiran Mane: 'मी अँकर नव्हे, अभिनेता म्हणून प्रसिद्ध'; किरण माने यांचा आदेश बांदेकरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:37 PM2022-02-04T18:37:09+5:302022-02-04T18:39:29+5:30

'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढून टाकल्यामुळे सुरू झालेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. किरण माने यांनी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.

Kiran Mane replay to aadesh bandekar I am famous as an actor not an anchor | Kiran Mane: 'मी अँकर नव्हे, अभिनेता म्हणून प्रसिद्ध'; किरण माने यांचा आदेश बांदेकरांना टोला

Kiran Mane: 'मी अँकर नव्हे, अभिनेता म्हणून प्रसिद्ध'; किरण माने यांचा आदेश बांदेकरांना टोला

googlenewsNext

मुंबई-

'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढून टाकल्यामुळे सुरू झालेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. किरण माने यांनी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे. किरण माने यांनी आज मुंबईत दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत काही गौप्यस्फोट देखील केले आहेत. 

अभिनेता किरण माने आणि अॅड. असीम सरोदे यांच्यासोबत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन कायदेशीर लढाई लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसला तशी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचीही माहिती किरण माने यांनी यावेळी दिली. 

आदेश बांदेकरांना लगावला टोला
मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आल्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी आपल्या पाठिशी उभं राहण्याची तयारी दर्शवली असल्याचं किरण माने यांनी यावेळी म्हटलं. पण स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन मालिकांचे निर्माते असलेले आदेश बांदेकर यांनी मात्र अशाप्रकारचं कोणतंही प्रकरण माझ्या ऐकिवात नाही असं विधान केल्याचं किरण माने यांना विचारण्यात आलं असता त्यांनी रोखठोक मत मांडलं. 

"काही लोकांचे लागेबांधे असतात. माझा कुणाशीही संबंध नाही. आदेश बांदेकर सहा वाजता ६ वाजता काहीतरी पैठणीचा कार्यक्रम करतात ऐवढीच माझी त्यांच्याशी ओळख आहे. त्यांच्या स्टार प्रवाहसोबत सिरिअल सुरू आहेत. हेही लक्षात घ्या. त्यामुळे कदाचित त्यांना बिचाऱ्यांना असं बोलावं लागलं असेल आणि प्रसिद्धचं म्हणाल तर मी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. मी अँकर म्हणून प्रसिद्ध नाही किंवा मी एखादा टीव्ही गेम प्ले चालवत नाही. मी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. माझी १० व्यावसायिक नाटकं आलेली आहेत. माझ्यावर ज्यांनी प्रसिद्धीचा आरोप केलाय तेवढं त्यांचं करिअर नसेल. त्यामुळे मला प्रसिद्धीचा का सोस असावा", असं किरण माने म्हणाले. 

किरण माने यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ-

५ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
किरण मानेंचा या संपूर्ण प्रकरणात जो अपमान झाला आहे. त्याप्रकरणी पॅनोरमा आणि त्यांच्याशी संबंधित एजन्सीला कायदेशी नोटीस पाठविण्यात आली आहे. किरण माने यांना सामाजिक स्तरावर अपमानित करण्यासोबतच वाळीत टाकण्यात आलं आहे. त्यांची बदनामी झाली आहे आणि स्त्रियांप्रती हा माणूस असंवेदनशील आहे अशी चुकीची प्रतिमा लोकांमध्ये पोहोचवली गेली आहे. त्यामुळे त्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यासाठी पॅनोरमा आणि इतर संबंधित एजन्सीने त्यांना ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असं आम्ही पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे, असं किरण माने यांचे वकील असीम सरोदे यांनी सांगितलं. 

Web Title: Kiran Mane replay to aadesh bandekar I am famous as an actor not an anchor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.