'...तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन', किरण मानेंची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 02:27 PM2022-06-01T14:27:44+5:302022-06-01T14:28:15+5:30

Kiran Mane: अभिनेता किरण माने काही दिवसांपूर्वी मुलगी झाली हो या मालिकेमुळे चर्चेत होते.

Kiran Mane's 'she' post came up in the discussion | '...तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन', किरण मानेंची 'ती' पोस्ट आली चर्चेत

'...तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन', किरण मानेंची 'ती' पोस्ट आली चर्चेत

googlenewsNext

मराठी छोट्या पडद्यावरील अभिनेता किरण माने काही दिवसांपूर्वी मुलगी झाली हो या मालिकेमुळे चर्चेत होते. किरण माने हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतेच किरण माने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी चाहत्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचे त्यांच्यावरील असलेल्या प्रेमाविषयी सांगितले आहे. किरण मानेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

किरण मानेंनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका गावाला भेट दिल्याचे दिसत आहे. त्यांना पाहून गावकऱ्यांना खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करून किरण मानेंनी लिहिले की, “महाराष्ट्रभर जाईल तिकडं लै लै लै प्रेम मिळतंय मला. भारावून गेलोय. हेरवाडला एक भगिनी आली आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाली,’तुमी लै आवडता आमाला.. तुमी नाय तर शिरेल बगायची बंद केली आमी. लै जीव तुटला आमचा तुमच्यासाठी. तुमाला वाईटसाईट बोलनार्‍या समोर आल्या तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन मी.’ मी हसलो. म्हन्लो,’उलट आभार मानूया त्यांचे ताई. त्यामुळं मला कळलं तुम्ही किती अफाट प्रेम करता माझ्यावर. माफ करा त्यांना”.


पुढे ते म्हणाले, “काल माणगांवच्या ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’च्या कार्यक्रमाआधी, आम्हा सर्वांना त्या ठिकाणाला भेट द्यायची उत्सूकता होती, जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी जिथं ‘माणगांव परीषद’ घेतली होती ! तिथं गेलो, तेवढ्यात मी आल्याची बातमी आंबेडकर भवनाच्या आसपासच्या घरांत पसरली. मला बघायला लोक घराबाहेर येऊन उभे राहीले…मनात आलं, तुमच्यासाठी व्हिडीओ काढावा ! बघा….” 

Web Title: Kiran Mane's 'she' post came up in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.