कॅन्सरला हरवून कामावर परतल्या किरण खेर; शिल्पा म्हणाली, मुझे गोद ले लो...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:20 PM2021-11-25T16:20:42+5:302021-11-25T16:22:02+5:30
India's Got Talent BTS Video: शिल्पा किरण खेर यांना असं का म्हणाली? पहा व्हिडीओ
कॅन्सरला हरवून किरण खेर (Kirron Kher)अखेर कामावर परतल्या आहेत. 69 वर्षांच्या किरण खेर लवकरच ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’चा (India's Got Talent) नवा सीझन जज करताना दिसणार आहेत. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ), मनोज मुंतशीर आणि बादशाहसोबत हा सीझन त्या जज करणार आहेत. शोचं शूटींगही सुरू झालंय आणि सेटवर आनंदाचं वातावरण आहे. शिल्पाने सेटवरचा एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे.
या व्हिडीओत किरण व शिल्पा शेट्टी धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. क्रिम कलरची साडी, त्यावर भरगच्च दागिने आणि कोरोनापासून बचावासाठ फेस शील्ड घातलेल्या किरण खेर नेहमीप्रमाणे आपल्या चिरपरिचीत अंदाजात दिसत आहेत. किरण काहीशा अशक्त दिसत आहेत. पण चेह-यावरचं हास्य आणि त्यांचा सळसळता उत्साह तोच आहे.
मला दत्तक घ्या...
व्हिडीओत शिल्पा शेट्टी किरण खेर यांची ज्वेलरी बघतेय. कदाचित ती केवळ तिचे दागिने शो-ऑफ करण्यासाठी इथे आलीय कदाचित, असं विनोदानं म्हणते. पुढे शिल्पा असं काही म्हणते की, ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. किरणचा मुलगा सिकंदर तर हे सर्व दागिने घालणार नाही. त्यामुळे किरण यांनी मला दत्तक घ्यायला हवं...,असं शिल्पा म्हणते. यावर अशी वेळ आलीच तर मी नक्की असं करेल, असं किरण म्हणतात.
पुढे किरण खेर एक खुलासाही करतात. त्या म्हणतात, ‘मी काही दिवसांआधीच सिकंदरला माझे काही दागिने विकत असल्याचं सांगितलं. कारण तो लग्न करत नाहीये. पण तो मला दागिने विकू नकोस म्हणाला. मी पण त्याला लवकर मला सून किंवा मुलगी आणून दे म्हटलं.’ पण किरण यांनी हे सांगताच शिल्पाने सिकंदरला थेट धमकीच दिली. ‘सिकू, ही सगळी ज्वेलरी मी घेतेय...,’असं ती म्हणाली.