बिग बॉस मराठी २ च्या घरात या कारणामुळे किशोरी शहाणे यांना रडू कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:09 PM2019-06-05T14:09:31+5:302019-06-05T14:12:05+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून राहात आहेत.
बिग बॉसचं घर सदस्यांच्या प्रत्येक भावभावनांचा साक्षी असते... राग, प्रेम, तिरस्कार, हसणं आणि रडणं या सगळ्या गोष्टी आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतात. या घरात अनेक लोकांसोबत १०० दिवस राहाणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. या १०० दिवसांच्या कालावधीमध्ये सदस्य या घरामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत असतात. टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते... पण यामध्ये कधी कधी नकळतपणे घरातील काही सदस्य दुखावले जातात हेच इतरांना कळत नाही. चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद रंगला. या भांडणात त्यांनी शिवानीला सायको असे देखील म्हटले... त्यावर शिवानीने देखील उत्तर दिले की, “किशोरी शहाणे असतील त्या त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा.”
बिग बॉस मराठीच्या घरात किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून राहात आहेत... त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटतो आहे... पण बिग बॉस यांनी दिलेल्या चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरी मध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्यांचं सामान खराब केलं, त्यांना टार्गेट करण्यात आले या गोष्टीचे किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितले... अभिजित बिचुकलेनी किशोरी शहाणे यांनी धीर द्यायचा प्रयत्न केला... अभिजीत बिचुकले यावर असे देखील म्हणाले, आताच्या आता १४ सदस्यांना तुमचं काय दु:ख आहे ते सांगू आणि तुमचे सामान काही असेल तर त्यांना ते तुम्हाला परत करायला सांगू... अभिजीत प्रमाणेच मैथिलीने देखील किशोरी शहाणे यांना खूपच समजवण्याचा प्रयत्न केला.
बिग बॉस म्हटला की, या घरात काही जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनतात तर काही जण एकमेकांचे चेहरे पाहायला देखील तयार नसतात. बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील टीम सदस्यांच्या भांडणामुळेच हा कार्यक्रम चर्चेत असतो.