वडिलांचं छत्र हरपलं, उपाशीपोटी दिवस काढले अन्, एका रात्रीत पालटलं अभिनेत्याचं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:16 PM2023-07-13T18:16:18+5:302023-07-13T18:26:38+5:30
अभिनेत्याचं बालपण हालाखीच्या परिस्थिती गेलं. पैशाची चणचण होती तो अनेकवेळा उपाशी पोटी झोपायचा.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या कवितेच्या ओळी अभिनेता सिद्धार्थ निगमला लागू होता. टीव्हीवरून बॉलिवूडच्या दुनियेत ठसा उमटवणाऱ्या सिद्धार्थ निगमचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. लहानपणी गरिबी पाहिली, वडील गमावल्यानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यानंतर टीव्हीच्या दुनियेत टाकलेल पाऊल. सिद्धार्थ निगम आज युथ आयकॉन बनला आहे.
सिद्धार्थ निगमचे टीव्ही शो आणि चित्रपट
सिद्धार्थ निगम हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार आहे, त्याने 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'चंद्रनंदिनी' आणि 'अलाद्दीन - नाम तो सुना होगा' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सिद्धार्थने 'धूम 3' चित्रपटात आमिर खानच्या बालपणीची भूमिकाही साकारली आहे. सिद्धार्थने 'धूम 3' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तो रातोरात स्टार बनला. त्यानंतर तो टीव्हीकडे वळला. पण त्यांचे बालपण संघर्षमय होते.
एकदा सिद्धार्थ निगमने बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्याचं बालपण हालाखीच्या परिस्थिती गेलं. पैशाची चणचण होती तो अनेकवेळा उपाशी पोटी झोपायचा. सिद्धार्थ म्हणाला, “मी खूप लहान असताना माझे वडील गेले. आमच्याकडे सर्व काही होते, पण वडील गेल्यानंतर आमच्यासाठी सर्व काही संपले. छोट्या गावात सगळं काही वडिलांच्या हातात असतं. अशा परिस्थितीत त्याच्या जाण्याने सर्व काही संपले होते, पण माझी आई खूप खंबीर स्त्री आहे.
आर्थिक चणचण
सिद्धार्थ पुढे म्हणाला होता, “माझी आई माझ्यासाठी देव आहे. मी खूप खोडकर होता, पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व काही बदलले. अलाहाबादला आलो तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते. मी चांगला विद्यार्थी नव्हतो. माझी काहीच स्वप्न नव्हते. वडील गेल्यानंतर सगळा भार आईवर पडला आणि ते खूप कठीण झाले. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही कधीकधी जेवत ही नव्हतो. सिद्धार्थने सांगितले की तो खेळात निपुण होता आणि त्याने जिम्नॅस्टिकला सुरुवात केली. तो 8 वर्षे वसतिगृहात राहिला.
सिद्धार्थ निगम सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, शहनाज गिल आणि पलक तिवारी यांच्याही भूमिका होत्या.