मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:41 PM2024-06-18T15:41:53+5:302024-06-18T15:42:29+5:30

मिलिंद गवळींनी त्यांच्या लाडक्या जावयासाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (milind gawali)

know about Milind Gawli's son in law work in serum institute pune aai kuthe kay karte | मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहून सक्रीय असतात. मिलिंद यांचा जावई दिग्वीजयचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद यांनी दिग्वीजयसाठी खास पोस्ट लिहिली आहे. मिलिंद गवळी लिहितात, "Happy Birthday My Hero आयुष्य कसं जगावं हे दिग्विजय कडूनच शिकावं, दिगूबाबाला मी अगदी त्याच्या लहानपणापासूनच ओळखतो, कुटुंबावर किती संकटं आली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे खांद्यावर पेलणारा दिगू बाबा मी अनेक वर्ष पाहत आलोय, पाचगणी ला होस्टेलमध्ये राहून शिक्षणाची जबाबदारी असो, वडील गेल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेणं असो."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "serum Institute (आपल्या देशातल्या अति महत्त्वाच्या कंपनी) मध्ये १२ वर्ष प्रामाणिक नोकरी करणे असो, किंवा कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला मित्रमंडळींना ज्याचा आधार वाटतो, जो आपल्या हक्काचा वाटतो, असा माझा हा दिगूबाबा, जावई कधी झालाच नाही, पहिल्या दिवसापासून माझा मुलगाच झाला,
माझा हिरो. आता अनेक वर्ष मी या सिनेमा क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे , मी खूप खोटे खोटे हिरो बघितले आहेत,
ज्यांना हिरो करण्यासाठी किंवा हिरो दाखवण्यासाठी असंख्य लोकाची , पडद्या मागच्या ४०-५० लोकांची मेहनत लागत असते, तरी पडद्या वर जेव्हा आपण त्यांना पाहतो तर ते हिरो वाटतच नाही, पण दिग्विजय भास्करराव कदम हा माझ्यासाठी खरा हिरो आहे, सिनेमातला हिरो होणं फार काही कठीण नाही असं मला वाटतं पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हिरो होणं खूप कठीण आहे, खूप मोठी गोष्ट आहे."


मिलिंद पुढे लिहितात, "गेली सात आठ वर्ष मी दिग्विजय ला सिरम इन्स्टिट्यूट मध्ये, research lab मध्ये बाहेरून एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा एखादी मुंगी सुद्धा आत जाऊ शकत नाही, त्याच्या आत मध्ये तो तासंतास काम करून, डोक्याचा भुगा झाल्यानंतर सुद्धा बाहेर पडल्यानंतर हसतमुख राहून, दुसऱ्यांना ही प्रसन्न ठेवून, धमाल मस्ती करत, स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन, Sports Cinema literature, adventure, travelling सगळ्या गोष्टींमध्ये मनापासून interest
घेऊन, इतरांची मन सांभाळत, आनंदी राहतो, तोच खरा हिरो असतो, So दिग्विजय फक्त हिरो दिसत नाही तर माझ्यासाठी तो माझा खरा हिरो आहे.
वडील म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उदंड यशस्वी आरोग्यदायी आणि आनंदमय आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
मिथिला आणि दिग्विजय दोघेही खूप खूप सुखी रहा."

Web Title: know about Milind Gawli's son in law work in serum institute pune aai kuthe kay karte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.