जाणून घ्या वो... अपना सा फेम रिद्धी डोंगराचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 07:27 AM2017-03-21T07:27:08+5:302017-03-21T12:57:08+5:30

रिद्धी डोंगरा सध्या वो...अपना सा या मालिकेत निशाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत ...

Know that ... the fitness fund of Riddhi hill in your own fame | जाणून घ्या वो... अपना सा फेम रिद्धी डोंगराचा फिटनेस फंडा

जाणून घ्या वो... अपना सा फेम रिद्धी डोंगराचा फिटनेस फंडा

googlenewsNext
द्धी डोंगरा सध्या वो...अपना सा या मालिकेत निशाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिचा पती आदित्य म्हणजेच सुदीप साहिरच्या आयुष्यात कहर माजवण्यासाठी सध्या ती कारणीभूत ठरत आहे. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. ती आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या फिटनेसलादेखील तितकेच महत्त्व देते. तिचा सध्या जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणासाठी जात असला तरी ती तिचे वर्कआऊट शेड्युल कधीही चुकवत नाही. रिद्धीला व्यायामासोबतच योगा आणि नृत्य करायला खूप आवडते. नियमितपणे व्यायाम करण्याचे अनेक फायदे असल्याचे तिचे म्हणणे आहे. डाएट आणि वर्कआऊट यांमुळेच ती फिट असल्याचे तिचे म्हणणे आहे. याविषयी रिद्धी सांगते, "फिटनेस हा केवळ तुम्ही चांगले दिसण्यासाठी नव्हे तर स्वतःला चांगले वाटण्यासाठीदेखील गरजेचा आहे. व्यायाम केल्याने तुमच्या मनाला एक प्रकारचा तजेला मिळतो असे मला वाटते. तसेच यामुळे तुमची त्वचादेखील चांगली होते आणि याची शरीरस्वास्थ्यामध्ये भर पडते. मी न चुकता वर्कआऊट करते. पण त्याचसोबत डाएटवरदेखील भर देते. मी बाहेरचे खाणे शक्यतो टाळते. मी घरी बनवलेले भारतीय पद्धतीचेच जेवण जेवते. तसेच माझे जेवणाचे टाइमटेबल ठरलेले आहे. मी रात्री सात नंतर काहीही खात नाही. तसेच 45 मिनिटांच्या वर्कआऊटमध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ करायचे असे माझे ठरलेले असते. तसेच मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मी एक तास तरी चालते. तसेच दिवसातून काही वेळ तरी दोरीवरच्या उड्या मारल्या तर कॅलरीज घटवण्यास मदत होते असे माझे म्हणणे असल्याने मी दोरीच्या उड्या आर्वजून मारते.  

Web Title: Know that ... the fitness fund of Riddhi hill in your own fame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.