जाणून घ्या 'गुलाम' मालिकेतील विकास मानकतालाचा हे रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 09:49 AM2017-02-16T09:49:21+5:302017-02-16T15:19:21+5:30

सध्याचं जीवन खूपच धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. कामासाठी दगदग, ताणतणाव हे नित्याचं झालंय. सेलिब्रिटीसुद्धा याला काही अपवाद नाही.‘गुलाम’ ...

Know the secret of the development norms in the 'slave' series? | जाणून घ्या 'गुलाम' मालिकेतील विकास मानकतालाचा हे रहस्य?

जाणून घ्या 'गुलाम' मालिकेतील विकास मानकतालाचा हे रहस्य?

googlenewsNext
्याचं जीवन खूपच धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. कामासाठी दगदग, ताणतणाव हे नित्याचं झालंय. सेलिब्रिटीसुद्धा याला काही अपवाद नाही.‘गुलाम’ मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणारा देखणा अभिनेता विकास मानकताला हा फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे.‘गुलाम’ मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेसाठी विकासने सात किलो वजन वाढविले असून त्यासाठी त्याने खास त्याचा डाएट प्लॅन केला आहे. परंतु लहानपणापासूनच त्याला फिटनेसची आवड होती. शाळेत असताना तो फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांमध्ये  सहभागी होत असे. तेव्हाही शारीरिक व्यायाम हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता आणि आजही तो तितकाच महत्त्वाचा भाग आहे. तो सांगतो, “शारीरिकदृष्ट्य़ा तंदुरुस्त राहणे ही माझ्या दृष्टीने जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट माझ्या फार लवकर लक्षात आली आणि तेव्हापासून मी त्याबाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. मी अलीकडेच ‘विंग चुन’ हा चिनी मार्शल आर्टसचा प्रकार शिकलो आहे, कारण मला माझं शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी त्याला विविध तंत्र आणि नवे व्यायाम प्रकार आत्मसात करायला लावायला आवडतं.”‘लेफ्ट राईट लेफ्ट’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेला हा अभिनेता एक दिवसही आपला व्यायाम चुकवत नाही आणि तो नियंत्रित आहार घेतो. “मी कसा दिसावं आणि मला कसं वाटलं पाहिजे, याबाबत मी फार काटेकोर आहे. माझ्या व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार मी त्यात बदल करतो. चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून कसाही वेळ काढून



रोजच्या रोज जिममध्ये जाण्यास मी चुकत नाही. मग ती वेळ कोणतीही असो. कधी खूप पहाटे किंवा कधी रात्री उशिराही मी जिममध्ये जातो,” असे विकासने सांगितले. विकासने आपल्या ‘गुलाम’ मालिकेतील अनेक सहकलाकारांना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास प्रोत्साहन दिले असून त्यांना तो सेटवरच व्यायामाचे काही धडे देतो.यासंदर्भात विकासला विचारले असता तो म्हणाला, “हो, ती गोष्ट खरी आहे. माझी तंदुरुस्तीची ध्येयं साध्य करण्यासाठी मी ज्या प्रकारे स्वत:ला वाहून घेतलं आहे, त्याची माझे मित्र स्तुती करतात. त्यांना माझ्यामुळे प्रेरणा मिळते, असं ते सांगतात आणि ते कधी कधी सल्ला मागण्यासाठी माझ्याकडे येतात. मी ही माझे सहकलाकार आणि दिग्दर्शक यांना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देतो. माझ्या मते प्रत्येकाने शारीरिक तंदुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे.”याशिवाय जेवणात खूप सारं सॅलेड, फळं आणि ज्यूसचाही समावेश असतो. या सर्व गोष्टी तुम्हाला फिट ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळं योग्य डाएट, वर्कआऊट आणि वेळेवर जेवण केल्यास तुम्ही फिट राहू शकता. त्यामुळं या गोष्टी फॉलो करा आणि फिट रहा असेच मी इतरांनाही सांगेन.

Also Read:म्हणून ‘गुलाम’मालिका भाष्य करणार तृतीयपंथीयावर

Web Title: Know the secret of the development norms in the 'slave' series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.