आधी भाऊला एका नाटकासाठी 100 रूपये मिळायचे, आता एका एपिसोडसाठी मिळतात इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:00 AM2021-06-13T08:00:00+5:302021-06-13T08:00:02+5:30

परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने भाऊंनी अनेक छोटी-मोठी कामे केली. पण अभिनय हे नेहमीच त्यांचे पहिले प्रेम होते.

know unknown facts about chala hawa yau dya fame bhau kadam | आधी भाऊला एका नाटकासाठी 100 रूपये मिळायचे, आता एका एपिसोडसाठी मिळतात इतके पैसे

आधी भाऊला एका नाटकासाठी 100 रूपये मिळायचे, आता एका एपिसोडसाठी मिळतात इतके पैसे

googlenewsNext
ठळक मुद्देआज भाऊ कदम स्टेजवर आलो की लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडतात. प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येकाला आज भाऊ कदम आपला माणूस वाटतो.

विनोदवीर भाऊला कोण ओळखत नाही. होय, आम्ही बोलतोय ते भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजे सर्वांचे लाडके भाऊ कदम (Bhau Kadam) याच्याबद्दल. आपल्या धम्माल विनोदबुद्धीने आणि अचूक टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणा-या भाऊंचा अंदाज तर  सगळ्यांना माहितच आहे पण हिच कॉमेडी सादर करण्यासाठी भाऊ कदम एका एपिसोडसाठी किती रूपये घेतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर हजारोंत.

भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये गेलं. त्यांचे शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झालं. वडिलांच्या अकाली निधन झाल्यानंतर भाऊंना वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत डोंबिवलीत राहायला गेले. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. पण अभिनय हे नेहमीच त्यांचे पहिले प्रेम होते.

भाऊने रंगभूमीवरून  अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.‘जाऊ तिथे खाऊ’ हे त्याचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते. या नाटकामुळे भाऊंच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

सुरुवातीला नाटकात काम करताना भाऊला १०० रुपये मिळायचे. नंतर १५०, २५०, ३५०, ७५० एवढं मानधन मिळायला लागलं. त्यातून घर संसाराचा गाडा कसाबसा चालायचा. आज त्याच भाऊ कदम  एका एपिसोडसाठी ऐंशी हजार रुपये घेतात, असे कळते.
आज भाऊ कदम स्टेजवर आलो की लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडतात. प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येकाला आज भाऊ कदम आपला माणूस वाटतो. भाऊंनी नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि पाचशेहून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे. 
   

Web Title: know unknown facts about chala hawa yau dya fame bhau kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.