Bigg Boss Marathi 3 मधल्या स्पर्धकावर आली होती शेण अन् कचरा उचलण्याची वेळ,काय होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:32 PM2021-09-20T14:32:00+5:302021-09-20T14:32:19+5:30
महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत पुन्हाएकदा सगळ्याची मने जिंकली.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस मराठी सिझन ३ ची दणक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती.अखेर यावरुन पडदा उठला. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत पुन्हाएकदा सगळ्याची मने जिंकली.
स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले...याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एंट्री झाली. याशिवाय तरुण कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची देखील एंट्री झाली. सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ३ च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले आहेत.बिग बॉस मराठीचे अलिशान घरं बघून सगळेच अवाक झालेत.
सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या खासगी आयुष्यावरही आता चर्चा रंगू लागल्या आहेत. शोमुळे सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या अभिनय करिअरपेक्षा खासगी आयुष्यावरच जास्त चर्चा रंगत आहेत. यापैकी स्नेहा वाघचा ही एक किस्सा समोर आला आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून स्नेहा वाघने रसिकांचे मनोरंजन केले आहे.
'मेरे साई' मालिकेतली भूमिका सगळ्यांत आव्हानात्मक भूमिका असल्याचे तिने सांगितले होते. या भूमिकेसाठी तिला प्रचंड मेहनतही करावी लागली होती. मालिकेच्या शूटिंग दरम्यान भूमिकेची गरज म्हणून कधी कचरा गोळा केला तर कधी शेणही उचलले होते. इतकेच काय तर लोकांचे पायही धुतले आहेत.
स्नेहा वाघने 'एक वीर की अरदास...वीरा', 'ज्योति', 'शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंह', 'चन्द्रशेखर' यासारखे टीवी मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. आता बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये स्नेहा वाघ कसी खेळी खेळणार रसिकांचे कितपत मनोरंजन करणार हे पाहणे रंजक असणार आहे.