आता तर त्याचा चेहराही पाहण्याची इच्छा नाही, कृष्णा अभिषेकवर संतापली गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 12:49 PM2021-09-10T12:49:59+5:302021-09-10T13:00:25+5:30
कृष्णा अभिषेक या एपिसोडमध्ये दिसणार नाही याला कारणीभूत आम्हीच आहोत. आमच्या येण्यामुळे कृष्णा या भागात झळकणार नसल्याचे त्याने ठरवले आहे.
अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्यात गेल्या काही वर्षापासून वाद सुरु आहे. दोघेही कधीच एकत्र दिसत नाही. कपिल शर्मा शोमध्ये गोविंदा पत्नी सुनितासह हजेरी लावणार आहे. मामा गोविंदा शोमध्ये हजेरी लावरणार म्हणून अभिषेक कृष्णा अभिषेक या भागात दिसणार नाही.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द कृष्णाने सांगितले आहे. गेल्यावर्षीसुद्धा जेव्हा गोविंदाने शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा कृष्णा त्या भागात झळकला नव्हता. या दोघांचा वाद इतका चिघळत चालला आहे की, दोघेही एकमेकांचे चेहरे सुद्धा पाहणे पसंत करत नाही.
कृष्णानंतर गोविंदाची पत्नी सुनीता अहुजानेही ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रीया दिली आहे. कृष्णा या एपिसोडमध्ये दिसणार नाही याला कारणीभूत आम्हीच आहोत. आमच्या येण्यामुळे कृष्णा या भागात झळकणार नसल्याचे त्याने ठरवले आहे. या गोष्टीचे मला फार वाईट वाटले आहे. गेल्याच वर्षी गोविंदाने दोघांच्या नात्यावर भाष्य केले होते. त्यावेळी सांगितले होते की, दोघेही कौटुंबिक वाद जगासमोर आणणार नाही.
घरातल्या गोष्टी घरातच राहणे चांगले. त्यानुसार गोविंदाने कधीही दोघांच्या नात्यावर सगळ्यांसमोर बोलणे टाळले होते. भविष्यातही दोघांमधला वाद मिटेल असे वाटत नाही. यावर इतकी चर्चा रंगते जी खरोखर मर्यादेपलिकडेच गेली आहे. त्यामुळे यावर आता गप्प न राहता बोलणेच योग्य आहे.
मुळात कृष्णाने खासगी आयुष्यातल्या गोष्टी घरापर्यंतच ठेवायला हव्यात मात्र तो असे कधीच करत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही एका स्टेजवर येतो तो तेव्हा उपस्थित राहत नाही. याउलट तो मीडियामध्ये आमच्याविषीय उलट सुलट बोलत असतो. कृष्णाचे असे वागणे बघून गोविंदा मात्र काहीच प्रतिक्रीया देत नाही.गोविंदाचे असे गप्प राहणे मला अजिबात पटत नाही. त्यामुळे गोविंदाचाही मला राग येतो. कृष्णा असे किंवा नसेल या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही. याउलट जेव्हा गोविंदा शोमध्ये हजेरी लावतो तो शो हिटच असतो. कृष्णाने जे काही यश मिळवले आहे. ते फक्त गोविंदामुळेच असे मला वाटतं. बऱ्याचदा त्याच्या कॉमेडी स्किटमधून तो मामा गोविंदाचा उल्लेख करतो. मामा गोविंदाशिवाय तो इंडस्ट्रीत स्थान टिकवू शकतो इतके टॅलेंट त्याच्यात नाही असे सुनिता आहुजा यांनी प्रतिक्रीया देत नात्यावर भाष्य केले आहे.
कृष्णा अभिषेक आणि गोविंदाचे नाते बिघडायला कारणीभूत दोघांच्या पत्नी आहेत असे बोलले जाते. काही वर्षापूर्वी कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने एक ट्विट केले होते. ते ट्विट गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाला चांगलेच खटकले होते. त्यामुळे दोघांच्याही कुटंबात तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून दोघांचे नाते चांगले नसल्याचे बोलले जाते. दोघींच्यावादामुळे कृष्णा आणि गोविंदाचे बिनसल्याचे बोललेल जाते.