​‘कुल्फीकुमार बाजेवाला’मधील सरदारजीच्या भूमिकेत असलेली बालकलाकार कोण आहे, हे कळल्यावर बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 07:12 AM2018-04-19T07:12:34+5:302018-04-19T12:42:34+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मालिकेत कुल्फी ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकृती ...

Knowing who is the child artist in the role of Sardarji in 'Kulfikumar Bajwala' | ​‘कुल्फीकुमार बाजेवाला’मधील सरदारजीच्या भूमिकेत असलेली बालकलाकार कोण आहे, हे कळल्यावर बसेल आश्चर्याचा धक्का

​‘कुल्फीकुमार बाजेवाला’मधील सरदारजीच्या भूमिकेत असलेली बालकलाकार कोण आहे, हे कळल्यावर बसेल आश्चर्याचा धक्का

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मालिकेत कुल्फी ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्मा या बालकलाकाराने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेचे कथानक वेगाने पुढे सरकत असून सध्याच्या कथेनुसार कुल्फीच्या आई निम्रतचे (श्रृती शर्मा) नुकतेच निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर एकटी पडलेली कुल्फी वडील सिकंदर (मोहित मलिक) यांच्या शोधार्थ आपल्या गावाहून मुंबईला निघाली आहे. पण मुंबईला जाणे या छोट्या मुलीसाठी तितकेसे सोपे नाहीये. कारण तिच्या मागे काही गुंड लागले आहेत आणि त्यामुळे त्यांचा डोळा चुकवून मुंबईची ट्रेन पकडण्यासाठी कुल्फी एका सरदारजीच्या मुलाचा वेश घेते. कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेमुळे एक नवीन गेटअप करायला मिळाला असल्याने सध्या या मालिकेत कुल्फीची व्यक्तिरेखा साकारणारी आकृती शर्मा चांगलीच खूश आहे. आपल्या या नव्या वेशाबद्दल उत्साहित झालेल्या कुल्फीने सांगितले, “मालिकेतला सरदारजीचा वेश मला खूप आवडला. मोठी मुलं कशी वागतात, हे मी आता माझ्या मोठ्या भावाकडून शिकते आहे. सेटवरच्या सर्वांना माझा सरदारजीचा वेश फार आवडला असून त्यात मी फार गोड दिसते आहे, असे ते मला सांगत होते.”
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते असे दाखवण्यात आले आहे. कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून फिरत नव्या गोष्टींचा शोध घेत असते. पण आता ही कुल्फी मुंबईत आली असून एका नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिचे हे नवे रूप देखील प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : कुल्फी कुमार बाजेवालामध्ये बरूण सोबतीची होणार एंट्री?

Web Title: Knowing who is the child artist in the role of Sardarji in 'Kulfikumar Bajwala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.