सूर जुळले! अंकिता वालावलकर-कुणाल भगतचा साखरपुडा; कोकण थीमच्या 'रिंग प्लॅटर'ने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:06 IST2025-02-15T11:05:32+5:302025-02-15T11:06:18+5:30

अंकिताच्या साखरपुड्याचे सुंदर Photos

kokan hearted girl ankita prabhu walawalkar got engaged to kunal bhagat see photos | सूर जुळले! अंकिता वालावलकर-कुणाल भगतचा साखरपुडा; कोकण थीमच्या 'रिंग प्लॅटर'ने वेधलं लक्ष

सूर जुळले! अंकिता वालावलकर-कुणाल भगतचा साखरपुडा; कोकण थीमच्या 'रिंग प्लॅटर'ने वेधलं लक्ष

'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकरचा (Ankita Walwalkar) काल साखरपुडा झाला. कोकणातील देवबाग येथील घरीच त्यांचा सोहळा संपन्न झाला. संगीतकार कुणाल भगतसोबत ती आता लग्नबंधनता अडकणार आहे. उद्या १६ फेब्रुवारी रोजी देवबागमध्येच त्यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. अंकिताने सोशल मीडियावर साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

हिरवी काठापदराची साडी, भरजरी दागिने अशा लूकमध्ये अंकिता साखरपुड्यासाठी तयार झाली. तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. तर कुणालने पांढरा कुर्ता त्यावर जॅकेट या लूकमध्ये आला. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. अगदी साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा झाला. 'देवाला माहित होतं की माझ्या हृदयाला तुझी गरज आहे. engaged and loving it. locked for life."


या साखरपुड्याला रिंग प्लॅटरही खूप छान सजवण्यात आलं होतं. कोकण थीमचं रिंग प्लॅटर होतं ज्याचा फोटोही अंकिताने शेअर केला आहे. नारळाचं झाड,आंब्याचं झाड, आंब्याच्या मिनी पेट्या, होडी, मासे झावळ्या, आणि समोर दोन अंगठ्या अशा प्रकारे रिंग प्लॅटरची सजावट करण्यात आली. 



 
अंकिता आणि कुणाल गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. झी मराठीच्या एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली. आता ते साताजन्माची गाठ बांधण्यासाठी सज्ज आहेत. अंकिताची मित्रमंडळी, दोघांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडणार आहे.

Web Title: kokan hearted girl ankita prabhu walawalkar got engaged to kunal bhagat see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.