"फक्त पैशासाठी प्रामाणिकपणा" बेटिंग ॲप्सची जाहिरात करणाऱ्यांवर भडकली अंकिता वालावलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:39 IST2025-01-31T12:39:09+5:302025-01-31T12:39:32+5:30
बेटिंग ॲप्सबद्दल काय म्हणाली अंकिता वालावलकर?

"फक्त पैशासाठी प्रामाणिकपणा" बेटिंग ॲप्सची जाहिरात करणाऱ्यांवर भडकली अंकिता वालावलकर
Betting App : बेटिंग ॲपवरून अनेक लोकांची फसवणूक होत आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्ल्युएन्सर्स बेटिंग ॲप्सच्या जाहिराती करतात,. त्यामुळे अनेक युवक जुगाराच्या ॲप्सच्या अधीन होत आहेत. बेटिंग ॲप्स आणि त्याच्या जाहिराती करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावकर (Ankita Walawalkar ) संताप व्यक्त केलाय. अंकिता वालावलकर हिनं बेटिंग ॲप्सच्या जाहिराती न करण्याचा सल्ला इन्फ्ल्युएन्सर्सना (No To Betting Apps)दिलाय.
अंकिताने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. तिनं लिहलं, "एक इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही कोणाची तरी ताकद आहात. तुमच्यावर एक जबाबदारी आहे. तुम्हाला लोकांसाठी आवाज उठवता येतो. तुम्हाला अशा संधी मिळतात, ज्या मिळवण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. म्हणून तुम्ही तुमच्या फॉलोवर्सशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे. त्यामुळे फक्त पैशासाठी प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता गमावू नका. #saynotobettingapps सट्टेबाजी धोकादायक असू शकते आणि पैसे कमविण्याचा हा कोणताही योग्य मार्ग नाही. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा" असं तिनं म्हटलं आहे.
अंकिताच्या या कृतीचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अंकिता वालावलकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अंकीता ही इन्फ्ल्युएन्सर म्हणुन जितकी लोकप्रिय आहे तितकीच ती अनेकदा सामाजिक भानही जपत असते. अनेकदा अंकिता सामाजिक कार्य करताना दिसते.