'तुझ्याशी शेवटचं बोलायचं राहून गेलं...'; अंकिता वालावलकरला अश्रू अनावर, कुटुंबाच्या आठवणीत सर्व भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:00 PM2024-08-16T12:00:45+5:302024-08-16T12:02:12+5:30

एरवी घरात कल्ला आणि राडा होणारं बिग बॉस मराठीचं घर आज भावुक होताना दिसणार आहे. घरच्यांच्या आठवणीत सदस्य भावुक (bigg boss marathi 5)

kokan hearted girl ankita walawalkar emotional for family bigg boss marathi 5 | 'तुझ्याशी शेवटचं बोलायचं राहून गेलं...'; अंकिता वालावलकरला अश्रू अनावर, कुटुंबाच्या आठवणीत सर्व भावुक

'तुझ्याशी शेवटचं बोलायचं राहून गेलं...'; अंकिता वालावलकरला अश्रू अनावर, कुटुंबाच्या आठवणीत सर्व भावुक

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये कल्ला आणि राडा झालेला पाहायला मिळतोय. सर्वच सदस्य जबरदस्त खेळ खेळून घरात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. एरवी एकमेकांच्या नाकीनऊ आणणारे बिग बॉस मराठीमधले सदस्य आज मात्र भावुक होताना दिसणार आहेत. बिग बॉसने सदस्यांना फोन घेऊन कुटुंबाशी बोलायला सांगितलं. त्यावेळी सर्वच सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं.

सर्व सदस्य घरच्यांच्या आठवणीत भावुक

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यात कुटुंबाशी बोलताना सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं. सुरुवातीला पाहायला मिळतं की, वर्षा उसगावकर बाबांच्या आठवणीत भावुक होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर दुसरीकडे अंकिता मालवणी भाषेत रडत रडत बोलताना दिसते की, "तुझ्या वांगडा शेवटचा बोलायचा रवला रे." पुढे निक्की तांबोळी, अरबाज, छोटा पुढारी, आर्याच्या डोळ्यांतही पाणी आलेलं दिसतं. पुढे सूरजही आईच्या आठवणीत भावुक झालेला दिसला.


बिग बॉस मराठीमध्ये आज कॅप्टनसीसाठी लढत

बिग बॉस मराठीच्या घरात आज नवीन कॅप्टनसाठी लढत बघायला मिळणार आहे. घरातला नवीन कॅप्टन होण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण हे तिघे कॅप्टनसी कार्यासाठी चांगला खेळ खेळताना दिसणार आहेत. आता घराचा नवीन कॅप्टन कोण होईल, हे आजच्या भागात कळून येईलच. बिग बॉस मराठीचा सध्या तिसरा आठवडा सुरु असून उद्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार, याची उत्सुकता आहे.

 

Web Title: kokan hearted girl ankita walawalkar emotional for family bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.