साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर... 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता अन् कुणालचं पहिलं केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 11:34 IST2025-01-12T11:34:30+5:302025-01-12T11:34:49+5:30
अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर... 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता अन् कुणालचं पहिलं केळवण
कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे. अंकिता लवकरच संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ (Wedding) बांधणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता व कुणाल (Sindhudurg) लग्न करणार आहेत. अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्न म्हटलं की नवरा नवरीचे लाड करणारं केळवण देखील आलं. अंकिताच्याही केळवणाला सुरूवात झाली आहे.
अंकिता आणि कुणाल यांचं पहिलं केळवण नुकतंच पार पडलं आहे. अंकितानं पहिल्या केवळणाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पारंपरिक लूकमध्ये अंकिता गोड दिसत होती. दोघांना पंच पक्वांनाचे जेवण वाढण्यात आले होते. अगदी पारपंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या केळवणामध्ये अंकिता आणि कुणालच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपू शकला नाही. यावेळी अंकितानं "समोर आहे बांसुदी, खायची झाली आहे मला घाई, कुणालचं नाव घेते सुरू झाली लगीनघाई" असा उखाणाही घेतला.
काहीच दिवसांपूर्वी अंकिता वालावलकरने तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. केळीच्या हिरव्या पानाचं डिझाईन असलेली ही पत्रिका लोकांच्या पसंतीस उतरली. अंकिता आणि कुणाल या दोघांनी अद्याप लग्नाची तारीख उघड केलेली नाही. त्यामुळे अंकिता नेमकी केव्हा विवाहबंधनात अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अंकिताचा होणारा नवरा कुणालचं गाव अलिबाग (Alibaug) आहे. कुणालने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन (Music Direction) केले आहे.