KBC 14 मध्ये कोल्हापूरच्या गृहिणीनं मारली बाजी, कविता चावला बनली पहिली करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 07:15 PM2022-09-17T19:15:27+5:302022-09-17T19:15:54+5:30

Kaun Banega Crorepati 14: कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या कविता चावला एक कोटी रुपये जिंकल्या आहेत.

Kolhapur housewife Kavita Chawla becomes the first millionaire in KBC 14 | KBC 14 मध्ये कोल्हापूरच्या गृहिणीनं मारली बाजी, कविता चावला बनली पहिली करोडपती

KBC 14 मध्ये कोल्हापूरच्या गृहिणीनं मारली बाजी, कविता चावला बनली पहिली करोडपती

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) अनेकांचा आवडता शो आहे. सध्या या शोचा चौदावा सीझन सुरु आहे. प्रत्येक सीझन करोडपती कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. अशात कौन बनेगा करोडपती सीझन १४ चा पहिला करोडपती मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या कविता चावला एक कोटी रुपये जिंकल्या आहेत. या सीझनमध्ये १ कोटी कमावणारी पहिलीच स्पर्धक कविता चावला ठरली आहे. 

कविता चावला यांनी कौन बनेगा करोडपती शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. पण त्या पुन्हा जिद्दीने शोमध्ये परतल्या. गृहिणी असलेल्या ४५ वर्षीय कविता यांनी १ कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र त्या ७ कोटींपर्यंत पोहचल्या का नाही हे अद्याप अस्पष्टच आहे. कविता त्याचा मुलगा विवेकसोबत शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. येत्या सोमवार आणि मंगळवारी हा भाग सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. मागील वर्षीच्या सीझनमध्येही बऱ्याच महिला करोडपती झाल्या होत्या. 


दरम्यान, 'कौन बनेगा करोडपती' या शोचा प्रत्येक सीझन खूप लोकप्रिय ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही भरपूर प्रेम मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. प्रत्येक सीझनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक खूप उत्साही असतात. 

Web Title: Kolhapur housewife Kavita Chawla becomes the first millionaire in KBC 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.