'तू आशिकी' मध्ये 'कोळी डान्स' विशेष भाग!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 06:25 AM2018-04-23T06:25:39+5:302018-04-23T11:55:39+5:30
कलर्स वर प्रसारित होणाऱ्या तू आशिकी, या संगीतमय रोमान्स ने लक्षवेधक कथा आणि उल्हसित कलाकारांमुळे लोकप्रियता मिळवली आहे. तरुण ...
क र्स वर प्रसारित होणाऱ्या तू आशिकी, या संगीतमय रोमान्स ने लक्षवेधक कथा आणि उल्हसित कलाकारांमुळे लोकप्रियता मिळवली आहे. तरुण पंक्ति (जन्नत झुबेर रहमानी) चा प्रवास या शो मध्ये दाखविण्यात आलेला आहे जिला तिच्या स्वतःच्या आईनेच (गौरी प्रधान तेजवानी) एका श्रीमंत आणि विकृत माणसाला विकले आहे कारण तिची पैशाची हाव अमर्यादित आहे. पंक्तिला संगीताची अतिशय आवड आहे आणि त्यामुळेच ती आहानशी जोडली जाते, तो एक असभ्य रॉकस्टार असून तिला पाहिल्यावर प्रथमदर्शनी तिच्या प्रेमात पडलेला आहे.
शो मध्ये सध्या, एमएमएस स्कँडल नंतर लोकांच्या मानखंडनेचा सामना केल्यानंतर वखवखलेल्या नजरांपासून पंक्तिला वाचविण्यासाठी तिला लांब नेण्याचा निर्णय आहानने घेतलेला आहे. ते शहरातून पळ काढतात आणि एका कोळी गावात येऊन पोचतात आणि तेथे ते काही दिवस आश्रयाला राहतात. त्यांना कुटुंबातील लोकांप्रमाणे वागविणाऱ्या त्या स्थानिक लोकांसारखे कपडे ते घालतात.
या भागामध्ये सुरसता आणण्यासाठी निर्माते गळ्यात सांखळी सोन्याची या प्रसिध्द लोकगीत सादर करणार आहेत आणि ते आहान व पंक्ति मिळून एका लग्नसमारंभात गावकऱ्यां सोबत गाणार आहेत. यावर बोलताना, जन्नत झुबेर रहमानी म्हणावी, “पंक्ति या पात्राला एमएमएस स्कँडल नंतर खूप अडचणींचा आणि मानहानीचा सामना करावा लागला आहे. कोळी गावातील या विश्रांती मुळे तिच्या आत्मसन्मानाच्या उपमर्दातून बाहेर यायला तिला मदत होते. इतर कर्मचाऱ्यां सोबत गळ्यात साखळी सोन्याची याचे चित्रीकरण करणे मला अतिशय आवडले- हे एक मजेदार चुरचुरीत गाणे आहे आणि त्याच्यावर खूप छान डान्स करता येतो.”
ऋत्विक अरोरा म्हणाला, “आम्हा सर्वांसाठी हा सिक्वेन्स खूप छान होता. आमच्या नेहमीच्या कामापेक्षा हे अगदी वेगळे होते, त्यात डान्स, अॅक्शन आणि सुंदर संगीत सुध्दा होते. गळ्यात साखळी सोन्याची चे चित्रीकरण अगदी लाजबाब होते आणि आम्ही चित्रीकरणाच्या आधी आणि नंतर सुध्दा खूप मजा केली”