१ मिस्ड कॉल द्या अन् जिंका २ कोटी!, 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:43 PM2023-02-21T15:43:48+5:302023-02-21T16:26:42+5:30

सोशल मीडियावर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.

Kon honar crorepati new season coming soon sachin khedekar host season | १ मिस्ड कॉल द्या अन् जिंका २ कोटी!, 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच भेटीला

१ मिस्ड कॉल द्या अन् जिंका २ कोटी!, 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच भेटीला

googlenewsNext

'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे. 1 मिस्डकॉल द्या आणि 2 कोटी जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. 

  ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणार्‍या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला २ करोड रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती'च्या आधीच्या सगळ्या पर्वांना स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाही 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.  

अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागी स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं काम मोठ्या खुबीनी करतात. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरवर्षीप्रमाणे मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक सहभागी होण्यासाठी नोंदणी करून घेऊ शकतात. यंदाच्या सिझनमध्ये काय वेगळेपण असेल, स्पर्धक कसे असतील, २ करोड रुपये कोणी जिंकू शकेल का; हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.


 

Web Title: Kon honar crorepati new season coming soon sachin khedekar host season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.