बॉयफ्रेंडसोबत कुलदेवतेचं दर्शन करुन अंकिता वालावलकरने दाखवली लग्नाची पत्रिका; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:22 IST2024-12-29T12:22:11+5:302024-12-29T12:22:36+5:30
कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असलेली अंकिता वालावलकरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय

बॉयफ्रेंडसोबत कुलदेवतेचं दर्शन करुन अंकिता वालावलकरने दाखवली लग्नाची पत्रिका; फोटो व्हायरल
कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असणारी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. अंकिताने बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाच गाजवला. अंकिता सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नासंबंधी चांगलीच सक्रीय आहे. अंकिता आणि तिचा नवरा कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताने लग्नाआधी तिची पत्रिका कुलदेवतेला दाखवली आहे. अंकिता-कुणालच्या लग्नाचा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
अंकिता-कुणालच्या लग्नाची पत्रिका व्हायरल
अंकिता-कुणालच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अंकिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अंकिताने तिच्या लग्नपत्रिकेचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. केळीच्या हिरव्या पानाचं डिझाईन असलेली ही पत्रिका लोकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिली पत्रिका कुलदेवतेला आणि आजोळच्या देवीला #कोकणी परंपरा असं कॅप्शन देऊन अंकिताने लग्नाची पत्रिका शेअर केलीय.
अंकिता-कुणाल लवकरच करणार लग्न
अंकिता वालावलकरने बिग बॉसमध्ये असताना तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. पण बॉयफ्रेंड कोण हे सांगितलं नव्हतं. शेवटी बिग बॉसमधून बाहेर आल्यावर अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला. कुणाल भगत असं अंकिताच्या बॉयफ्रेंडचं असून तो एक गायक-संगीतकार आहे. अंकिता - कुणाल जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.