क्रांती रेडकरच्या गोंडस जुळ्या मुली अखेर कॅमेऱ्यात कैद, लेकींचं कौतुक करत शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:59 AM2023-08-29T11:59:37+5:302023-08-29T11:59:54+5:30
एकीच्या पायाला दुखापत झाली तर लगेच जुळ्या बहिणीने...क्रांती रेडकरची पोस्ट
मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) नेहमी तिच्या व्हिडिओ मुळे चर्चेत असते. तिचे हटके व्हिडिओ चाहतेच नाही तर अनेक कलाकारही एन्जॉय करत असतात. क्रांतीला झिया आणि जायदा या जुळ्या मुली आहेत. त्यांचे किस्से, गंमतीजमती सुद्धा ती व्हिडिओतून सांगत असते. मात्र आजपर्यंत तिने लेकींना कॅमेऱ्यासमोर आणलेलं नव्हतं. नुकतंच क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडिओत जुळ्या मुली कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत.
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे सध्या चर्चेतलं कपल आहे. पतीच्या संकटकाळी क्रांती त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली आहे. क्रांतीने २०१८ मध्ये जिया आणि जायदा यांना जन्म दिला. त्यांचं वय आता ५ वर्ष आहे. क्रांतीने एक छानशी पोस्ट शेअर करत दोघी बहिणींमधलं बाँडिंग कसं आहे हे सांगितलं आहे. ती लिहिते, 'गोदोच्या पायाला महिनाभर प्लॅस्टर होतं. आता ती बरी आहे. हळूहळू चालत आहे. ती अतिशय हुशार, सहनशील आणि समजुतदारही आहे. पण आमची खरी हिरो मिस छबिल वानखेडे आहे. ती बहिणीच्या मागे सावलीसारखी उभी राहिली. त्यांच्या शाळेतील स्टाफने मला सांगितलं की झायदा जियासाठी किती काय करते. ती तिची काळजी घेते. तिच्या बॅगेतून पुस्तकं काढून देते, तिची बॅग परत भरते. वॉशरुमला जाताना तिच्यासाठी बाहेर उभी राहते. तिचा डबा उघडून देते. जियाच्या पायाला प्लॅस्टर असलं तरी झायदा तिची छोट्यातली छोटी कामं करते. आम्ही शाळेतून घरी आल्यावर मुलींचं खूप कौतुक केलं आणि उभं राहून टाळ्या वाजवल्या. त्यांच्यातलं हे प्रेम असंच टिकून राहील अशी आशा केली. आम्हाला या संकटकाळात बळ देण्यासाठी देवाचे आभार.'
क्रांतीची ही पोस्ट सगळ्यांनाच आवडली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने 'सिस्टर्स' अशी कमेंट केली आहे. या व्हिडिओत मुलींचा चेहरा दिसत नाही. मात्र त्या एकमेकींचा हात धरुन चालत आहेत. दोघींनी सारख्याच टाईपचा फ्रॉक घातला असून पोनी बांधली आहे. आता मुलींचा चेहराही दाखवा अशी चाहत्यांनी विनंती केली आहे. तसंच मुलींवर खूपच चांगले संस्कार केल्याबद्दल क्रांतीचं कौतुक केलं आहे.