​क्रितिका कार्माने चंद्रकांता पाहिलेच नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 11:19 AM2017-02-10T11:19:53+5:302017-02-10T16:49:53+5:30

चंद्रकांता हा नव्वदीच्या दशकातील एक प्रसिद्ध कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता प्रेक्षकांना चंद्रकांत ...

Kristika Karma did not see the Chandrakanta | ​क्रितिका कार्माने चंद्रकांता पाहिलेच नव्हते

​क्रितिका कार्माने चंद्रकांता पाहिलेच नव्हते

googlenewsNext
द्रकांता हा नव्वदीच्या दशकातील एक प्रसिद्ध कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता प्रेक्षकांना चंद्रकांत एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.
प्रेम या पहेली चंद्रकांता या मालिकेत क्रितिका कार्मा चंद्रकांता ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. क्रितिका कित्येक वर्षांनंतर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तिच्या या नव्या भूमिकेविषयी ती सध्या खूप उत्सुक आहे. चंद्रकांता या भूमिकेविषयी ती सांगते, "चंद्रकांता हा कार्यक्रम देवकी नंदन खत्री यांच्या कादंबरीवर आधारित होता. पण हा कार्यक्रम मी कधी पाहिलाच नव्हता. त्यामुळे चंद्रकांता ही व्यक्तिरेखा मी माझ्या स्टाइलमध्ये सादर करण्याचे ठरवले आहे. मी लहान असताना या कार्यक्रमाचे काही भाग पाहिले असावेत. पण आता मला या कार्यक्रमातील काहाही आठवत नाहीये. आणि या भूमिकेची तयारी करताना हा कार्यक्रम पाहावा असे मला कधी वाटलेदेखील नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात या भूमिकेविषयी कोणतीही पार्श्वभूमी तयार नाहीये. मी जुना कार्यक्रम पाहिला असता तर मी त्याचप्रकारे अभिनय केला असता. त्याचमुळे हा कार्यक्रम पाहायचा नाही असे मी ठरवले होते. चंद्रकांता ही व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे, कारण मी आतापर्यंत कधीच कॉस्च्युम ड्रामामध्ये काम केलेले नाहीये. या मालिकेसाठी एखादी राजकुमारी कशाप्रकारे चालते, बोलते या गोष्टी मला शिकाव्या लागत आहेत. तसेच मी या मालिकेसाठी सध्या घोडस्वारीदेखील शिकत आहेत. त्याचसोबत हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांचे धडे गिरवत आहे." 
चंद्रकांता या मालिकेची निर्मिती करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसने आतापर्यंत महादेव, सिया के राम यांसारखे प्रसिद्ध कार्यक्रम छोट्या पडद्यावर सादर केले आहेत. 

Web Title: Kristika Karma did not see the Chandrakanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.