'आता टीव्ही इंडस्ट्रीत काम करणार नाही', कृतिका कामराने केली टेलिव्हिजनची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:00 PM2024-10-24T14:00:03+5:302024-10-24T14:00:46+5:30

कृतिकाने नुकतंच एका मुलाखतीत टीव्ही इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं.

Kritika Kamra left Tv industry as it affected her physical and mental health | 'आता टीव्ही इंडस्ट्रीत काम करणार नाही', कृतिका कामराने केली टेलिव्हिजनची पोलखोल

'आता टीव्ही इंडस्ट्रीत काम करणार नाही', कृतिका कामराने केली टेलिव्हिजनची पोलखोल

टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा (Kritika Kamra) अनेक  मालिकांमधून दिसली. 'कितनी मोहोब्बत है','कुछ तो लोग कहेंगे' या तिच्या गाजलेल्या मालिका. 'कितनी मोहोब्बत है' मालिकेतून तिच्या आणि करण कुंद्राच्या अफेअरची चर्चा झाली. नंतर काही वर्षांनी कृतिका कामरा टीव्ही इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता ती फक्त ओटीटीवर काम करते. शिवाय सिनेमांमध्येही दिसते. कृतिकाने नुकतंच एका मुलाखतीत टीव्ही इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं.

....म्हणून सोडली टीव्ही इंडस्ट्री

२०१७ मध्ये कृतिकाने टीव्ही इंडस्ट्री सोडली. क्रिएटिव्हिटीच संपत चालल्याचं तिला जाणावलं. मानसिकरित्याही ती खचत होती. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत कृतिका कामरा म्हणाली, "याबद्दल प्रामाणिकपणे बोलूया. टीव्हीवर काम करणं सध्या कंफर्टेबल वाटत नाही. तो सेट, ते आयुष्य ग्लॅमरस नाही. शूटिंग लाईफ आणि वर्किंग लाईफ हा सेट असतो याशिवाय तुमचं आयुष्यच नसतं. हे कम्फर्टेबल नाही पण सुरक्षित जॉब होता. एका पॉईंटनंतर तुम्हाला खूप थकायला होतं. माझ्या शरिरावर आणि मेंटल हेल्थवर परिणाम होत होता. तरी सुद्धा मी शूट करत होते कारण ते माझं पॅशन होतं.  मी खूप प्रयत्न केले पण जेव्हा क्रिएटिव्हिटीच संपत होती मी म्हणाले आता बास...आता मी हे आणखी करु शकत नाही."

कृतिकाने 'बेस्ट गर्लफ्रेंड','मित्रो',' भीड' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. तिची काही दिवसांपूर्वी 'ग्यारह ग्यारह' सीरिज रिलीज झाली. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. याशिवाय ती 'फ्रेंड जोन','हश हश','तांडव' यासारख्या सीरिजमध्येही दिसली. आता ती 'मटका किंग' या वेब शो मध्ये दिसणार आहे.

Web Title: Kritika Kamra left Tv industry as it affected her physical and mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.