'द कपिल शर्मा'शोमध्ये का झालं नाही 'द कश्मीर फाइल' सिनेमाचं प्रमोशन? केआरकेने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:52 PM2022-03-11T18:52:10+5:302022-03-11T18:58:34+5:30
काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून द कपिल शर्मा शोमध्ये त्यांचा सिनेमा 'द कश्मीर फाइल'ला प्रमोट न करण्यात आलाचा आरोप केला होता.
बॉलिवूडमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झाला तर कमाल आर खान (KRK) त्यावर बोलल्याशिवाय राहत नाही. आता केआरकेने फिल्म मेकर विवेक अग्निहोत्री आणि कपिल शर्मा यांच्यातील वादात उडी घेतली आहे. पण यावेळी त्याने ट्विट करून नाही तर व्हिडीओतून आपला मुद्दा मांडला आहे.
काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून द कपिल शर्मा शोमध्ये त्यांचा सिनेमा 'द कश्मीर फाइल'ला प्रमोट न करण्यात आलाचा आरोप केला होता. विवेक अग्निहोत्रीच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर कपिल शर्मा शोबाबत वेगवेगळी चर्चा होऊ लागली होती. यानंतर कपिलने एका यूजरच्या ट्विटला उत्तर देत सांगितलं होतं की, कधीही एकतर्फी स्टोरीमध्ये विश्वास ठेवू नये. म्हणजे काहीतरी गडबड आहे.
आता यावर केआरके काय म्हणाला? व्हिडीओत सर्वातआधी केआरकेनने विवेक अग्निहोत्री यांचा सिनेमा द कश्मीर फाइलचा उल्लेख केला. त्यानंतर तो म्हणाला की, हा शो कपिल शर्माचा नाहीये. कपिल शर्मा त्यात अभिनय करून पैसे कमावतो आणि घरी जातो. त्यामुळे हे कपिलच्या हातात नाही की, शोमध्ये कोण येणार आणि कोण नाही.
व्हिडीओत केआरकेने दावा केला की, विवेक अग्निहोत्रीच्या पीआर टिमने सोनी टीव्हीसोबत कपिल शर्मा शोबाबत संपर्क केला असेल. यादरम्यान सोनी टीव्हीवाल्यांनी त्यांना २५ लाख रूपये मागितले असतील. यानंतर विवेक अग्निहोत्री म्हणाले असतील की, हा सिनेमा कमी बजेटचा आहे. ते प्रमोशनसाठी इतका पैसा कुठून आणतील. त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन फ्रीमध्ये झालं पाहिजे. बस यावरच विवेक भाऊ रागावले असतील आणि त्यांनी सोशल मीडियावर न्यूज दिली.
केआरकेचं म्हणणं आहे की, सोनी टीव्ही सिनेमाच्या प्रमोशनसाठी २५ लाख रूपये घेते. यात किती तथ्य आहे हे तर कुणाला माहीत नाही. पण केआरके नेहमीच अशा वादांमध्ये उड्या घेत राहतो. आता हे सत्य आहे की खोटं याचा निर्णय तुम्ही करा.