'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती जोगची एन्ट्री, सायली आणि अर्जुनच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:21 IST2025-04-01T12:12:51+5:302025-04-01T12:21:16+5:30

'ठरलं तर मग' या मालिकेत  लोकप्रिय अभिनेत्री क्षीती जोग हिची एन्ट्री होणार आहे.

Kshitee Jog Entry In The Serial Tharla Tar Mag Actress Play Lawyer Role Against Arjun Subedar Watch Promo | 'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती जोगची एन्ट्री, सायली आणि अर्जुनच्या अडचणी वाढणार

'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती जोगची एन्ट्री, सायली आणि अर्जुनच्या अडचणी वाढणार

Tharala Tar Mag: प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. जुन्या मालिकांमध्ये नवनवीन पात्रं आणून कथानक आणखी रंजक बनवणं, हे ट्विस्ट सध्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात. हाच प्रयोग स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत करण्यात आला आहे. 'ठरलं तर मग' ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही सायलीच्या भुमिकेत आहे. टीआरपीमध्ये नंबर १ वर असलेल्या या मालिकेत ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. आता या मालिकेत  लोकप्रिय अभिनेत्री क्षीती जोग हिची एन्ट्री ( Kshitee Jog Entry In Tharla Tar Mag) होणार आहे. मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत.

'ठरलं तर मग' मालिकेत सध्या अश्विनशी लग्न करुन प्रिया घरात आल्यानं सायली-अर्जुनच्या अडचणी वाढल्यात. पण, ते प्रियाची कट कारस्थाने उलथून लावत आहेत.  घर सांभाळून अर्जुन-सायली हे साक्षी शिखरेविरोधात पुरावे शोधत आहेत. तर दुसरीकडे साक्षीला तुरुंगातून सोडवण्यासाठी महिपत वेगवेगळ्या वाटा शोधतोय. पण, अर्जूनविरोधात कोर्टात लढण्यासाठी कोणताही वकिल तयार नाही. पण, आता महिपतला अर्जुनच्या अगदी तोडीस तोड असलेल्या आणि पर्यंत एकही केस न हरलेल्या नामांकित वकिलीण बाई दामिनी देशमुख हाती लागल्या आहेत. त्यामुळे महिपतला साक्षीच्या सुटकेची आशा दिसतेय.


आजच्या भागाच्या शेवटी प्रोमोमध्ये दामिनी देशमुख यांची एन्ट्री पाहायला मिळाली आहे.  कार मधून उतरल्यावर त्या ऐटीत चालत दिसल्यात. पत्रकार तिच्या पाठी फिरत असतात. त्यातला एक जण तिला विचारत की आम्ही असा ऐकलं की तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवणार आहात? यावर ती म्हणते की ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही दुसऱ्यांना हरवायला नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी केस लढते. आता अ‍ॅड. दामिनी देशमुखचा सायली-अर्जुनला कसा सामना करणार आणि या लढाईत कोण जिंकणार हे आपल्याला आगामी भागात पाहायला मिळेल.

Web Title: Kshitee Jog Entry In The Serial Tharla Tar Mag Actress Play Lawyer Role Against Arjun Subedar Watch Promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.