किर्ती नागपुरे दिसणार कुलदीपक या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 10:21 AM2017-03-06T10:21:34+5:302017-03-06T15:51:34+5:30
किर्ती नागपुरेने ओळख या मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती परिचय, ना बोले तुम ना मैंने कुछ ...
क र्ती नागपुरेने ओळख या मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती परिचय, ना बोले तुम ना मैंने कुछ कहा, नागार्जुन-एक योद्धा, बेटा ही चाहिये, देश की बेटी नंदिनी, एक वीर की अर्धास...वीरा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आता ती कुलदीपक या नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत वाईट कृत्यांचा अवतार असलेल्या आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आईची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या आईची भूमिका किर्ती नागपुरे साकारणार आहे. या मालिकेत ती विद्या ही व्यक्तिरेखा साकारत असून या मालिकेतील तिची ही भूमिका तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या मालिकेची कथा राजकोट या शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारी असून या मालिकेतील किर्तीचा लूकही खूप वेगळा आहे. ती या मालिकेत गुजराती साड्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.
किर्ती ही मराठी असून पुणे या शहरात ती लहानाची मोठी झाली आहे. ती तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेविषयी किर्ती सांगते, "कुलदीपक या मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या कारकिर्दीत मी पहिल्यांदा एक गुजराती भूमिका साकारत आहे. मी साकारत असलेली विद्या ही आमच्या कुटुंबातील सर्वात तरुण सून दाखवली असून ती प्रचंड मितभाषी पण सर्जनशील आहे. तिला शिल्पकला साकारायला खूपच आवडते. या मालिकेची कथा ही खूप वेगळी आणि छान असून या मालिकेत एक गूढकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गूढरहस्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे."