‘... उतना टीआरपी बढ़ेगा, समझा करो...’! ‘इंडियन आयडल 12’वादावर बोलले कुमार सानू  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:40 AM2021-06-23T10:40:09+5:302021-06-23T10:42:12+5:30

‘इंडियन आयडल 12’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आता कुमार सानू यांनी या वादात उडी घेतली आहे.

kumar sanu open up on reality shows indian idol said more gossip gets higher trp | ‘... उतना टीआरपी बढ़ेगा, समझा करो...’! ‘इंडियन आयडल 12’वादावर बोलले कुमार सानू  

‘... उतना टीआरपी बढ़ेगा, समझा करो...’! ‘इंडियन आयडल 12’वादावर बोलले कुमार सानू  

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 12’ हा शो गेल्या काही दिवसांपासून सतत वादात आहे.  नवा एपिसोड टेलिकास्ट झाला रे झाला की, ‘इंडियन आयडल 12’चे ट्रोलिंग सुरू होते.

‘इंडियन आयडल 12’ ( IndianIdol 12) हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे या शोवर सोशल मीडिया युजर्स जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे या वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी वक्तव्य ऐकायला मिळत आहेत. आता 90 व्या दशकात गाजवणारे बॉलिवूड सिंगर कुमार सानू (Kumar Sanu) यांनी या वादात उडी घेतली आहे. जितके जास्त गॉसिप, तेवढा जास्त टीआरपी, असे ते म्हणाले.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांनी म्युझिक इंडस्ट्रीबद्दल भाष्य केले. इंडियन आयडल हा सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो सध्या चर्चेत आहे.  या शोमध्ये टॅलेंटला प्रोत्साहन दिले जाते, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न यावेळी कुमार सानू यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. (Kumar Sanu open up on reality shows Indian Idol)

‘जितके जास्त गॉसिप, तेवढा जास्त टीआरपी, समजून घ्या. ही काही फार मोठी गोष्ट नाही. टॅलेंटला त्याचा मार्ग मिळतोय आणि रिअ‍ॅलिटी शो अशा टॅलेंटला समोर आणण्यांचे काम करतात. इंडियन आयडलच नाही तर सर्वच शो असं टॅलेंट समोर आणतात. कदाचित या शोमधील अनेकांना इंडस्ट्रीत संधी मिळणार नाही. पण या व्यासपीठांमुळे त्यांना अन्य ठिकाणी काम करण्याची व पैसा कमावण्याची संधी मिळू शकते,’ असे कुमार सानू म्हणाले.
‘इंडियन आयडल 12’ हा शो गेल्या काही दिवसांपासून सतत वादात आहे.  नवा एपिसोड टेलिकास्ट झाला रे झाला की, ‘इंडियन आयडल 12’चे ट्रोलिंग सुरू होते.

गेल्या आठवड्यात  फादर्स डे स्पेशल एपिसोडवरूनही या शोला लोकांनी ट्रोल केले होते.  हा एपिसोड पाहून लोक भडकले होते. सर्व स्पर्धकांचे वडिल या एपिसोडमध्ये हजर होते. त्यांनी स्टेजवर अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्या ऐकून शोचे जज कमालीचे भावुक झालेत. अनु मलिक, हिमेश रेशमिया आणि सोनू कक्कर ढसाढसा रडताना दिसले. पण नेटक-यांनी याला ‘ओव्हर ड्रामा’चे नाव दिले होते. पाठोपाठ ट्विटरवर ‘इंडियन आयडल 12’वरचे अनेक मीम्स व्हायरल झालेत. ‘इंडियन आयडल 12’ला मेकर्सनी डेली सोप बनवलेय, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्यात होत्या. या सगळ्या इमोशनल स्टोरी केवळ टीआरपी मिळवण्यासाठी केलेला ड्रामा आहे, असे मत अनेकांनी नोंदवले होते.

Web Title: kumar sanu open up on reality shows indian idol said more gossip gets higher trp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.