'इंडियन आयडॉल सीझन १५'मधून कुमार सानू यांचा पत्ता कट, या सिंगरची लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:02 IST2024-09-24T17:00:32+5:302024-09-24T17:02:35+5:30
Indian Idol 15 : इंडियन आयडॉल १५ लवकरच सुरू होणार आहे.

'इंडियन आयडॉल सीझन १५'मधून कुमार सानू यांचा पत्ता कट, या सिंगरची लागली वर्णी
'इंडियन आयडॉल सीझन १५' (Indian Idol 15) या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये अनेक प्रतिभावान गायक आपल्या सुरेल आवाजाची जादू दाखवत आहेत. यंदाच्या सीझन १५ बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. गायक कुमार सानू यांना जज म्हणून शोमधून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. निर्मात्यांनी त्यांच्या जागी एका नवीन गायकाला परीक्षकाच्या खुर्चीवर बसण्याची संधी दिली आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिॲलिटी शो इंडियन आयडॉल गायन टॅलेंटला नवीन उभारी देण्यासाठी ओळखला जातो. पण सध्या इंडियन आयडल सीझन १५ संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. कारण आगामी सीझनच्या संदर्भात निर्मात्यांनी ज्येष्ठ गायक कुमार सानू यांना परीक्षकाच्या खुर्चीवरून हटवले आहे. शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या जागी नवीन गायकाची निवड केली आहे.
कुमार सानू यांच्या जागी या लागली गायकाची वर्णी
गेल्या सीझनपासून कुमार सानू यांनी इंडियन आयडॉलमध्ये जज म्हणून प्रवेश केला होता. इंडियन आयडॉल १५ चा प्रोमो व्हिडीओ सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये गायक आणि रॅपर बादशाह त्याच्याच स्टाईलमध्ये रंग भरताना दिसत आहे. यामुळे आता कुमार सानूऐवजी तो इंडियन आयडॉल १५ मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंडियन आयडॉल १५ लवकरच येणार भेटीला
बादशाह व्यतिरिक्त, गायक विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल इंडियन आयडॉलमध्ये दिसणार आहेत. अशाप्रकारे आता या रिॲलिटी शोमध्ये आणखी एका नव्या जजचा प्रवेश झाला आहे. इंडियन आयडॉल १५ लवकरच सुरू होणार आहे. शोची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही, परंतु असे सांगितले जाते की ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते.