'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीला कॅन्सर; ओळखणंही झालं कठीण, म्हणाली, "आयुष्य..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 02:59 PM2023-11-12T14:59:00+5:302023-11-12T15:00:43+5:30

डॉलीने 'तुझ संग प्रीत लगाई सजना' मधून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतर तिने हिटलर दीदी, देवों के देव… महादेव, कलश, कुमकुम भाग्य, सिंदूर की कीमा यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं.

kumkum bhagya actress dolly sohi cervical cancer as she share bald look photos people fans not recognised her | 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीला कॅन्सर; ओळखणंही झालं कठीण, म्हणाली, "आयुष्य..."

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीला कॅन्सर; ओळखणंही झालं कठीण, म्हणाली, "आयुष्य..."

'कुमकुम भाग्य' फेम डॉली सोहीने कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. अभिनेत्रीचा आताचा लूक पाहून तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे. डॉलीने 'तुझ संग प्रीत लगाई सजना' मधून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतर तिने हिटलर दीदी, देवों के देव… महादेव, कलश, कुमकुम भाग्य, सिंदूर की कीमा यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं. डॉली 48 वर्षांची असून कॅन्सरशी लढाई जिंकल्याचा आनंद आहे.

डॉली सोहीने इन्स्टाग्रामवर तिच्या बाल्ड लूकचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना डॉलीने "तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि माझ्यासाठी प्रार्थना केली. आयुष्य माझ्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखं आहे. पण जर तुमच्यात लढण्याची ताकद असेल, तर तुमचा प्रवास खूप सोपा होतो, जसं माझ्यासोबतही घडलं" असं म्हटलं आहे.

डॉलीने कॅन्सर आणि आजाराशी दिलेल्या लढ्याबद्दल ETimes शी मोकळेपणाने संवाद साधला. अभिनेत्रीने सांगितलं की, सुरुवातीला तिला लक्षणे दिसू लागली आणि कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण तिला या आजाराबाबत 6-7 महिन्यांपूर्वीच माहिती मिळाली. तिने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. पण वेदना सहन न झाल्याने तिने स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊन काही चाचण्या करून घेतल्या. 

डॉलीने सांगितले की, चाचणीनंतर तिला गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यानंतरच्या चाचण्यांमधून तिला सर्वाइकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अभिनेत्रीने कॅन्सरची लढाई जिंकल्याने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. 
 

Web Title: kumkum bhagya actress dolly sohi cervical cancer as she share bald look photos people fans not recognised her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.