टीव्ही अभिनेत्रीच्या घरी लग्नाच्या ५ वर्षांनी पाळणा हलला, गोंडस लेकीला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:23 IST2025-01-11T15:23:27+5:302025-01-11T15:23:47+5:30
'कुंडली भाग्य' मालिकेतील अभिनेत्री रुही चतुर्वेदी आई झाली आहे. रुहीने नववर्षाच्या सुरुवातीलाच आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी लग्नाच्या ५ वर्षांनी पाळणा हलला, गोंडस लेकीला दिला जन्म
काही महिन्यांपूर्वीच 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या आई झाली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. आता आणखी एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. श्रद्धा पाठोपाठ कुंडली भाग्य मालिकेतील अभिनेत्री रुही चतुर्वेदी आई झाली आहे. रुहीने नववर्षाच्या सुरुवातीलाच आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
रुहीने ९ जानेवारीला गोंडस लेकीला जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत तिने मुलगी झाल्याचं म्हणत पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रुहीचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचं बेबी शॉवर झालं होतं. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते.
प्रेग्नंन्सीमुळेच श्रद्धा आर्या आणि रुही चतुर्वेदीने 'कुंडली भाग्य' मालिका सोडली होती. रुहीने २ डिसेंबर २०१९ रोजी शिवेंद्र साईंयोलसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ५ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. रुही आणि शिवेंद्र आईबाबा झाल्यामुळे आनंदी आहेत.