मला प्रचंड कीव येतेय..., मणिपूर घटनेचा कुशल बद्रिकेनं केला निषेध, म्हणाला - 'श्रीकृष्णानं अवतरण्याची...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:58 AM2023-07-22T10:58:43+5:302023-07-22T10:59:21+5:30

Manipur Violance : मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याच्या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान कुशल बद्रिके यानेदेखील सोशल मीडियावर या घटनेचा निषेध केला आहे.

Kushal Badrike condemned Manipur incident, said - 'Sri Krishna's quote...' | मला प्रचंड कीव येतेय..., मणिपूर घटनेचा कुशल बद्रिकेनं केला निषेध, म्हणाला - 'श्रीकृष्णानं अवतरण्याची...'

मला प्रचंड कीव येतेय..., मणिपूर घटनेचा कुशल बद्रिकेनं केला निषेध, म्हणाला - 'श्रीकृष्णानं अवतरण्याची...'

googlenewsNext

मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याच्या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. या घटनेवर बॉलिवूडसह मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान आता चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके यानेदेखील सोशल मीडियावर या घटनेचा निषेध केला आहे. त्याने या घटनेची प्रचंड कीव येत असल्याचे म्हटले आहे.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण लाज निघाली ती पांडवांची.…ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे ह्याची मला प्रचंड कीव येते. मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा. कुशलच्या या पोस्टवर नेटकरीदेखील आपले मत व्यक्त करत संताप व्यक्त करत आहेत.

काय घडलं होतं मणिपूरमध्ये?
मणिपूरमध्ये ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावात महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा भीषण प्रकार घडला होता. त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचवण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार केला. तसेच दोन महिलांचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

Web Title: Kushal Badrike condemned Manipur incident, said - 'Sri Krishna's quote...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.