Kushal Badrike :  ही एक खोडी मला बालपणापासून आहे...; कुशल बद्रिकेची पोस्ट वाचली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:49 PM2022-11-01T17:49:50+5:302022-11-01T17:50:32+5:30

Kushal Badrike : सतत नवनवीन पोस्ट शेअर करत कुशल बद्रिके चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच खास पोस्ट चर्चेत आहे...

kushal badrike shared childhood memory of diwali share post | Kushal Badrike :  ही एक खोडी मला बालपणापासून आहे...; कुशल बद्रिकेची पोस्ट वाचली का?

Kushal Badrike :  ही एक खोडी मला बालपणापासून आहे...; कुशल बद्रिकेची पोस्ट वाचली का?

googlenewsNext

चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike ) म्हणजे धम्माल मनोरंजन. आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारा कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सतत नवनवीन पोस्ट शेअर करत तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. कुशलच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. नेहमीच तो आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी तो आपली पत्नी सुनयनाबरोबरचे व्हिडीओ शेअर करतो तर कधी मित्र विजू माने यांच्यासोबतचे धम्माल व्हिडीओ अपलोड करतो. साहजिकच त्याच्या पोस्टची चाहते वाट बघत असतात.  सध्या त्याची एक अशीच खास पोस्ट चर्चेत आहे. होय, दिवाळी संपली, पण दिवाळीच्या पोस्ट संपलेल्या नाहीत. 
कुशलने यंदाची दिवाळी दणक्यात साजरी केली. आता त्यावरची एक पोस्टही शेअर केली आहे. दिवाळी आणि फटाके आणि बालपणाची एक झक्कास आठवण त्याने यानिमित्ताने सांगितली आहे. 

 कुशलने या पोस्टसोबत फटाके फोडतानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तो लिहितो, ‘ही एक खोडी मला बालपणापासून आहे, वात नसलेले आणि न पेटलेले फटाके गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही. आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही मला वाटतं... दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात  चकली, शंकरपाळ्या  सापडतात ना! डब्याच्या तळाशी  करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखसमध्ये मिसळलेला जरासा  चिवडा  सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं  बालपण  आपल्याला सापडतच !!' फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे  बालपण...अगदी लाडवातल्या  मनुक्या  एवढं का होईना, ते आपल्यात उरतच.... 

कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘कुशल सर, कधी कधी वाटतं तुम्ही चुकीच्या फिल्डमध्ये आहात... जरा अजून लक्ष दिले तर तुम्ही योगेश आणि निलेशचा जॉब खाऊ शकता...,’अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Web Title: kushal badrike shared childhood memory of diwali share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.