Kushal Badrike :  कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:00 PM2022-09-20T14:00:30+5:302022-09-20T14:00:57+5:30

Kushal Badrike : होय, कुशल बालपणीच्या आठवणीत हरवला आहे आणि त्याने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

Kushal Badrike shared childhood memory share instagram post | Kushal Badrike :  कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा

Kushal Badrike :  कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा

googlenewsNext

चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके म्हणजे धम्माल मनोरंजन. आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारा कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सतत नवनवीन पोस्ट शेअर करत तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच पोस्ट लक्ष वेधून घेतेय. होय, कुशल बालपणीच्या आठवणीत हरवला आहे आणि या आठवणींना उजाळा देत त्याने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

कुशल लिहितो, ‘माझ्या जुन्या घराला लागून एक छोटं मैदान आहे, तसं माझं बालपण घरापेक्षा जास्त वेळ या मैदानातच गेलं खरंतर. अगदी भातुकलीपासून कबड्डी, खोखो, क्रिकेट, आबादुबी, लपंडाव, पतंग ते होळी, दिवाळी, दहीहंडी...पर्यंत सगळं सगळं तिथे अनुभवलं. आज माझ्या मुलाला निबंध म्हून 10 मार्कासाठी जे जे विषय आहेत ते ते सगळं माझं या मोकळ्या मैदानात शिकून आणि जगून झालंय. बालपणी इथल्या गवताचा वास आमच्या अंगाखांद्याला चिकटून राहायचा. कितीही घासून आंघोळ केली तरी जाता जायचा नाही हा वास. आता इतक्या वर्षांनी पाहिलं तर इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो...’

कुशल आपल्या अंबरनाथ गावच्या आठवणीत हरवलेला पाहून चाहतेही काही क्षण बालपणात गेले. अनेकांनी कुशलच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. बालपण खरंच किती सुंदर असतं, अशा आशयाच्या कमेंट्स अनेक चाहत्यांनी केल्या आहेत. अनेकांनी कुशलच्या लिखाणाचं कौतुक केलं आहे. सुंदर लिहितोस कुशल, असंच लिहित राहा, असं अनेकांनी त्याला सुचवलं आहे.

कुशलच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. नेहमीच तो आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी तो आपली पत्नी सुनयनाबरोबरचे व्हिडीओ शेअर करतो तर कधी मित्र विजू माने यांच्यासोबतचे धम्माल व्हिडीओ अपलोड करतो. साहजिकच त्याच्या पोस्टची चाहते वाट बघत असतात. 

Web Title: Kushal Badrike shared childhood memory share instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.