"तुझा जन्म माझ्या व्यथा जपण्यात गेला ", कुशलची पत्नीसाठी पोस्ट, म्हणतो - झेंडुची फुलं परवडत नाहीत म्हणून देवासमोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 10:41 AM2024-01-14T10:41:55+5:302024-01-14T10:42:31+5:30

"पहिल्या घराच्या बुकिंगसाठी तू पॉलिसी मोडली", कुशल बद्रिकेची पत्नीसाठी भावुक करणारी पोस्ट

kushal badrike shared emotional post for wife sunayana birthday seeking attention | "तुझा जन्म माझ्या व्यथा जपण्यात गेला ", कुशलची पत्नीसाठी पोस्ट, म्हणतो - झेंडुची फुलं परवडत नाहीत म्हणून देवासमोर...

"तुझा जन्म माझ्या व्यथा जपण्यात गेला ", कुशलची पत्नीसाठी पोस्ट, म्हणतो - झेंडुची फुलं परवडत नाहीत म्हणून देवासमोर...

'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनयाला विनोदाची झालर लावत कुशल प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या कुशलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता. सिनेसृष्टीत नशीब आजमवायला आलेल्या कुशलला स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागले. आणि त्याच्या या संपूर्ण प्रवासात कुशलची पत्नी सुनयना हिने त्याला पुरेपूर साथ दिली. 

कुशल अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत तिचं कौतुक करत असतो. आज तिच्या वाढदिवसानिमित्त कुशलने पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

पत्नीसाठी कुशलची पोस्ट

संसार म्हटलं की व्यवहार आला आणि व्यवहार म्हटलं की हिशोब .
आता हिशोब लावला, “तुझ्या-माझ्या” नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी!😳

आपल्या पहिल्या घराचं booking करण्यासाठी तुझी एकमेव असलेली policy मोडली होती. आता पुन्हा नवीन घर घेता येईल. पण ती “ती वेळ” परत करण्याची policy अजून कोणत्याच company कडे नाही बघ.

एका दसऱ्याला “झेंडूची फूलं” परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू ? सांग !

अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं, संक्रांतीला काळी साडी नेसायची अश्या सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या “व्यथा” जपण्यात गेला यार…

आता परवा परवाचीच गोष्ट नाही का ? mental stress च्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठीवरून हाथ फिरवत बसली होतीस…ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी ?

माझ्यासाठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवांपलिकडे काहीही देता येणार नाही मला. sorry आणि happy birthday...

कुशल आणि सुनयनाने २००९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांचं लव्ह मॅरेज आहेत. कुशल आणि सुनयनाला दोन मुलं आहेत. सुनयना एक कथ्थक डान्सर आहे. 

Web Title: kushal badrike shared emotional post for wife sunayana birthday seeking attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.