कुशल बद्रिकेची हरवलीय ही वस्तू, म्हणतो - "हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 11:34 AM2023-09-30T11:34:19+5:302023-09-30T11:34:44+5:30

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या हरवलेल्या वस्तूबद्दल सांगितले आहे.

Kushal Badrike's lost item, says - "It's been bothering me ever since I got to know that it's lost..." | कुशल बद्रिकेची हरवलीय ही वस्तू, म्हणतो - "हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय..."

कुशल बद्रिकेची हरवलीय ही वस्तू, म्हणतो - "हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय..."

googlenewsNext

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या विनोदी शैलीने रसिकांच्या मनावर अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) अधिराज्य गाजवतो आहे. विनोदाचा बादशाह म्हणून त्याला ओळखले जाते. छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या शोमधून तो घराघरात पोहचला आहे. या शोमुळे त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या हरवलेल्या वस्तूबद्दल सांगितले आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, माझं सालं एक पेन ड्राइव हरवलंय काही फोटो आणि व्हिडीओ असलेलं, तसं रोजच्या वापरात नव्हतं म्हणा ते, पण हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय. आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते बघा अचानक हरवते आणि सापडता सापडत नाही, तसं काहीसं हरवलय “आठवणींनी भरलेलं…” (सुकून)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
कुशलच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, दादा तो पेन ड्राइव्ह हरवेपर्यंतचाच सोबती होता. आठवणींचा त्रास करुन घेणं वा न घेणं आपल्यावर आहे.  माणस तर ठरवून दुखावून सोडून देतात. पेनड्राइव्हची आठवण तर तुला सुखद आनंद देईल. एका युजरने लिहिले की, काही गोष्टी येतात जातात. नवीन व्यक्ती नवीन पेनड्राइव्ह..नवीन आठवणी..असंच चालू राहतं. आणखी एकाने लिहिले की, पण जसं एखादी वस्तू हरवल्यावर आपण एकमेकांना विचारत बसतो कोणाला सापडली का ती हरवलेली वस्तू? तसं माणसं हरवल्यावर नाही करता येत.   

दरम्यान, गेली कित्येक वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून कुशल प्रेक्षकांना हसवतो आहे. अभिनयाबरोबर विनोदाची उत्तम सांगड घालत तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याने बऱ्याच मराठी चित्रपटात काम केले आहे. शेवटचा तो 'रावरंभा' चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसला होता. 

Web Title: Kushal Badrike's lost item, says - "It's been bothering me ever since I got to know that it's lost..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.