"आमचा संसार चालत नाही तो आम्हाला...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 09:11 AM2024-12-10T09:11:27+5:302024-12-10T09:12:24+5:30
Kushal Badrike : कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर पत्नी सुनयनासोबतचे फोटो शेअर करत मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.
'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) शोमधून घराघरात पोहचलेला विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सतत चर्चेत येत असतो. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. बऱ्याचदा सोशल मीडियावर त्याच्या मजेशीर पोस्ट पाहायला मिळतात. दरम्यान आता त्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत संसारावर पोस्ट शेअर केली आहे.
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर पत्नी सुनयनासोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, संसारात एक बोलणारं आणि एक ऐकणारं हवं तरच संसार नीट चालतो, आमच्या संसारात मी बोलणारा… आणि आमची “ही” मला जरा जास्तच बोलणारी आहे…. आमचा संसार चालत नाही तो आम्हाला घाबरून पुढे पुढे धावतोय…… कुशलच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
कुशलची ही मजेशीर पोस्ट सर्वांचच लक्ष वेधून घेत असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, आतंक का दूसरा नाम... बिबी..! तर दुसऱ्या युजरने म्हटले की, असाच सुखाने धावत संसार चालूदे तुमचा. आणखी एकाने लिहिले की, धावा सौख्यभरे.
वर्कफ्रंट
कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या कुशलला 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्याने 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्येही काम केले.