SHOCKING!! कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीने दिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 10:49 AM2020-01-05T10:49:25+5:302020-01-05T10:50:12+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या कुशलने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येने सर्वांनाचा धक्का बसला. गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या कुशलने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार ठरवण्यात येऊ नये, असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले होते. पण तरीही त्याच्या आत्महत्येसाठी कुशलच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या कारणीभूत असल्याचे म्हटले गेले होते. पत्नी ऑड्रे डोल्हेन हिच्यासोबतच्या वादामुळे त्याने आयुष्य संपवल्याचेही मानले गेले होते.
कुशलला पत्नी व मुलासोबत राहायचे होते. मृत्यूच्या काही दिवसांआधी तो पत्नीला भेटायला शांघायला गेला होता. पण पत्नीने त्याला भेटण्यास नकार दिला, अशी माहितीही समोर आली होती. आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुशलची पत्नी ऑड्रेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. होय, कुशलच्या आत्महत्येसाठी मला का जबाबदार ठरवले जातेय? असा सवाल तिने केला आहे.
पिपिंग मून या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ऑड्रेने हा सवाल केला. ‘कुशलच्या आत्महत्येनंतर माझ्यावर का टीका होतेय हे मला कळत नाहीये. आमच्या नात्यात कुशल अपयशी ठरला होता. त्याला कुटुंबाचे गांभीर्य कळत नव्हते. एक वडील म्हणूनही तो निष्काळजी होता. मुलाच्या भविष्याचा त्याने कधीच विचार केला नाही. मी कियानला (कुशल व ऑचा मुलगा) कधीच त्याच्याशी बोलण्यापासून थांबवले नव्हते.अनेकदा मी कुशलला शांघायला येऊन आमच्यासोबत राहायबद्दल म्हटले. पण त्याची इच्छा नव्हती. मीच कुशालचा खर्च सांगाळत होते. मी माझ्या परीने हे नाते वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तरीही त्याच्या आत्महत्येसाठी मला जबाबदार ठरवले जातेय, असे ऑड्रे या मुलाखतीत म्हणाली.
37 वर्षांच्या कुशलने 26 डिसेंबरला आत्महत्या केली होती. 27 डिसेंबरला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला ऑड्रे हजर होती.
२०१५ मध्ये त्याने यूरोपियन गर्लफ्रेन्ड ऑड्रे डोलनसोबत लग्न केले होते. २०१६ मध्ये दोघांना मुलगा झाला. मात्र कालांतराने दोघांमध्ये वाद होऊ लागलेत आणि कुशलची पत्नी मुलाला घेऊन शांघायला निघून गेली. कुशल मुलावर अपार प्रेम करायचा. मुलासोबतचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. अगदी मृत्यूच्या काही तासांपूर्वीही मुलासोबतचा एक फोटो त्याने पोस्ट केला होता.