कुसुम आणि अनुजचा विवाह सोहळा रंगणार ८ नोव्हेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:06 PM2021-11-03T20:06:29+5:302021-11-03T20:07:03+5:30

कुसुमची अट अनुजने मान्य केल्याने तिला जपणारा समजुतदार मुलगा अखेरीस तिला मिळाला आहे.

Kusum and Anuj's wedding ceremony will be held on November 8 | कुसुम आणि अनुजचा विवाह सोहळा रंगणार ८ नोव्हेंबरला

कुसुम आणि अनुजचा विवाह सोहळा रंगणार ८ नोव्हेंबरला

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनीवरील तुमच्या-आमच्यातली 'कुसुम' या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कुसूम या पात्राने आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपलेसे केले आहे. बऱ्याच जणांनी कुसूमचे स्थळ नाकारले होते. मात्र आता अखेर तिला तिच्या आयुष्यातील पार्टनर मिळाला आहे. त्यामुळे मालिकेत प्रेक्षकांना कुसुम आणि अनुज यांचा विवाह सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. 

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी, आई-वडिलांची काळजी करणारी स्वाभिमानी कुसुम आता अनुज सरनोबत याची बायको होणार आहे. कुसुमची अट अनुजने मान्य केल्याने तिला जपणारा समजुतदार मुलगा अखेरीस तिला मिळाला आहे. कुसुम तिच्या गुणांनी सरनोबतांच्या घरी सगळ्यांची लाडकी झाली आहे. कुसुम अनुज यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरही लग्नाच्या तयारीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. #कुसुमनुज हा हॅशटॅग चाहत्यांनी निवडला असून लग्नासाठी सगळेच उत्सुक आहेत. #कुसुमनुज यांचं लग्न ८ नोव्हेंबर, रात्री ८:३० वा. सोनी मराठीवर बघता येणार आहे.

'कुसुम' या हिंदी मालिकेचा हा मराठी रिमेक
२००१ साली हिंदीमध्ये 'कुसुम' नामक मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचे आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून प्रेरणा मिळेल.

Web Title: Kusum and Anuj's wedding ceremony will be held on November 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.