'सारं काही तिच्यासाठी'मधील लालीला पडली 'अंगारो सा' गाण्याची भुरळ, मराठमोळ्या अंदाजात श्रीवल्लीला दिली टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 20:43 IST2024-06-17T20:41:17+5:302024-06-17T20:43:19+5:30
Siddhirupa Karmarkar : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकर हिने अंगारो सा गाण्यावर रिल बनवला आहे आणि या रिलला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

'सारं काही तिच्यासाठी'मधील लालीला पडली 'अंगारो सा' गाण्याची भुरळ, मराठमोळ्या अंदाजात श्रीवल्लीला दिली टक्कर
अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'पुष्पा' (Pushpa 2 Movie) सिनेमाच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २' रिलीज होण्याआधीच त्यातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. अलिकडेच या सिनेमातील 'अंगारो सा' (Angaro Sa Song) हे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या या गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही 'अंगारो सा' गाण्यावर रिल बनवला आहे. दरम्यान आता 'सारं काही तिच्यासाठी' (Saara Kahi Tichyasathi) मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकर (Siddhirupa Karmarkar) हिने अंगारो सा गाण्यावर रिल बनवला आहे आणि या रिलला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
सध्या 'अंगारो सा' आणि 'एक लाजरान साजरा मुखडा' हे फ्युजन गाणंही सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यावर सिद्धीरुपा करमरकर थिरकली आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सुरुवातीला 'अंगारो सा' गाण्यावर अभिनेत्री अगदी कॅज्युअल लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने हुक स्टेप्सही केल्या आहेत. त्यानंतर या व्हिडीओत तिचा मराठमोळा ठसका पाहायला मिळत आहे. लालीचा हा फ्युजन डान्स चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सिद्धीरुपा करमरकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या ३० वर्षांपासून ती इंडस्ट्रीत सक्रीय कार्यरत आहे. तिने अनेक नाटक आणि मालिकेत काम केले आहे. सध्या सिद्धीरुपा झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने या मालिकेत लालीची भूमिका साकारली आहे. ग्रे शेड असलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.