लागीरं झालं जी या मालिकेतील अजिंक्य आणि शीतलच्या प्रेमकथेला मिळणार वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 09:17 AM2018-01-19T09:17:21+5:302018-01-19T14:47:21+5:30
छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक ...
छ ट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पावधीत मालिका लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरीही रसिकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय. आता तर लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी... अशी अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी थेट कबुली देणार आहे. टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे लागीर झालं जीचे अजिंक्य आणि शीतल यांचे प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचणार आहे. दोघांनीही आपण एकमेकांना आवडत असल्याची मूक कबुली दिली आहे. दोघांमध्ये प्रेमळ नोकझोक देखील होत आहे. पण अजूनही दोघांनी एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाही आहे. त्यामुळे आता शीतलने ठरवले आहे की, अजिंक्यला आपल्या मनातली भावना उघडपणे सांगायची. शीतल पवारने एखादी गोष्ट ठरवली की मग ती झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे शीतलचे प्रपोज देखील तिच्यासारखेच लाखात एक असणार आहे. चक्क आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन शीतल अजिंक्यला प्रपोज करणार आहे. लागीरं झालं जी या मालिकेच्या आगामी भागांमध्ये शीतल आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलेली असल्याचे दाखवण्यात येणार आहे. अजिंक्यला प्रपोज करण्यासाठी शीतल धडपड करणार आहे.
शीतल आणि अजिंक्यला एकमेकांच्या मनातली भावना माहीत आहे. पण केवळ प्रेम असून उपयोग नसतो तर ते शब्दांत व्यक्तही करावे लागते. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून कमिटमेंट घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते असे शीतलच्या मैत्रिणींना तिला सांगितले. शिवाय प्रपोज नेहमी मुलानेच का करावं? मुलीच्या मनात प्रेम आहे तर तिने ते व्यक्त करायला हरकत काय आहे? असा सल्ला देत यास्मिनने सुद्धा शीतलसोबत पैज लावली आहे की, अजिंक्यच्या आधी शीतलने त्याला प्रपोज करावे.
एनएसएसच्या कॅम्पच्या निमित्ताने आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचलेली शीतल अजिंक्यला शोधून काढते आणि सगळ्या ट्रेनिंग सेंटरसमोर अनोख्या पद्धतीने अजिंक्यला प्रपोज करते. पण शीतल पाठोपाठ हर्षवर्धन आणि जयश्री सुद्धा आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचतात. शिवाय घरामध्ये नाना शीतलचे नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवतात. अशा परिस्थितीत शीतल आणि अजिंक्यच्या नात्याचे काय होणार हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Also Read : लागीरं झालं जी या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने खऱ्या आयुष्यात आहे एकदम ग्लॅमरस