'लागिर झालं जी' फेम शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण आले एकत्र, अभिनेता म्हणतो - "आम्ही डिसेंबरची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:32 IST2024-08-31T15:31:40+5:302024-08-31T15:32:26+5:30
Nikhil Chavan And Shivani Baokar: निखिल चव्हाण याने इंस्टाग्रामवर शिवानी बावकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांचा हा फोटो चर्चेत आला आहे.

'लागिर झालं जी' फेम शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण आले एकत्र, अभिनेता म्हणतो - "आम्ही डिसेंबरची..."
'लागिर झालं जी' (Lagir Jhala Ji) मालिकेनं निरोप घेऊन खूप काळ उलटला आहे. तरीदेखील या मालिकेतील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून बहिण-भावाच्या भूमिकेतून अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) घराघरात पोहचले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. नुकताच निखिलने शिवानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरील कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे काही जण त्याच्या या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
निखिल चव्हाण याने इंस्टाग्रामवर शिवानी बावकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्ही डिसेंबरची वाट पाहत आहोत. त्यामुळे चाहत्यांना नेमकं ते दोघे डिसेंबरमध्ये काय करणार आहेत, असा प्रश्न पडला आहे. कदाचित काहींना ते दोघे लग्न करत आहेत का, असे वाटत असेल. पण तुमच्या माहितीसाठी, शिवानी आणि निखिल बहीण भाऊ आहेत. शिवानी निखिलला राखी बांधते. त्यामुळे कदाचित ते पुन्हा एकत्र काम करू शकतात.
झी २४तासच्या रिपोर्टनुसार, निखिल चव्हाणने या फोटोमागचे गुपित सांगितले आहे. त्याने सांगितले की, पुण्यात नवीन घर घेतले आहे आणि हे घर पाहण्यासाठी शिवानी गेली होती. डिसेंबरची वाट पाहत आहोत, हे कॅप्शन टाकण्यामागे निखिल म्हणाला की, त्याचा आगामी प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात येणार आहे. तर शिवानीसाठीही डिसेंबर महिना महत्त्वाचा आहे. डिसेंबर महिना या दोघांसाठी खास आहे. डिसेंबर महिन्यात नक्की काय होणार? हे जाणून घेणे कमालीचे ठरेल.