'लागीर झालं जी'मधील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, दिसतेय खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:30 IST2019-12-29T06:30:00+5:302019-12-29T06:30:00+5:30
'लागीर झालं जी' मालिकेतील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झालेत घायाळ

'लागीर झालं जी'मधील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, दिसतेय खूप ग्लॅमरस
छोट्या पडद्यावरील 'लागीर झालं जी' मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.
शिवानीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिमरी रंगाच्या गाऊनमधील फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती.
ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाडपणे आणि बिनधास्तपणे बोलू शकते.
जर्मन भाषा शिकण्याचा फायदा तिला नोकरी मिळवण्यातही झाला. त्यामुळे शीतली साकारण्याआधी तिने एका आयटी कंपनीत जर्मन ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं होतं.