'लागीर झालं जी' फेम राहुल्या अन् आज्यावर चढला 'नाटू नाटू'चा फिवर; पाहा दोघांचा भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 18:40 IST2023-03-15T18:39:54+5:302023-03-15T18:40:38+5:30
Nitish chavan: सध्या सोशल मीडियावर राहूल आणि नितिशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते RRR च्या नाटू नाटू या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत.

'लागीर झालं जी' फेम राहुल्या अन् आज्यावर चढला 'नाटू नाटू'चा फिवर; पाहा दोघांचा भन्नाट डान्स
'लागीरं झालं जी' ही मालिका कोणताही मराठी प्रेक्षक विसरणार नाही. लष्करात भरती होणाऱ्या तरुणाचा संघर्ष आणि त्यातच त्याची खुलत जाणारी लव्हस्टोरी या मालिकेत अत्यंत सुंदररित्या मांडण्यात आलं होतं. त्यामुळे ही मालिका छोट्या पडद्यावर विशेष गाजली. या मालिकेतील आज्या, शितली आणि राहुल्या या तीन भूमिकांना तर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. विशेष म्हणजे या कलाकारांमधील मैत्री अजूनही तशीच असून सध्या आज्या आणि राहुल्याचा 'नाटू नाटू' गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
'लागीर झालं जी' या मालिकेत आज्या म्हणजेच अजिंक्य ही भूमिका अभिनेता नितिश चव्हाण (Nitish Chavan) याने साकारली होती. तर, राहुल्याची भूमिका अभिनेता राहुल मकदूम याने वठवली होती. विशेष म्हणजे मालिकेतील ही जोडगोळी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. बऱ्याचदा ते एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.
सध्या सोशल मीडियावर राहूल आणि नितिशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते RRR च्या नाटू नाटू या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांची सिग्नेचर स्टेप हुबेहूब कॉपी केली आहे. तसंच त्यांच्यासोबत अन्यही काही मित्र दिसून येत आहे.
दरम्यान, अलिकडेच नितिशची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'मजनू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसंच तो काही म्युझिक अल्बममध्येही झळकला आहे.