"तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 06:30 PM2024-05-29T18:30:51+5:302024-05-29T18:31:06+5:30

'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत विद्या यांच्याबरोबर त्यांच्या दोन जुळ्या लेकीही झळकल्या आहेत.

lagir zal ji fame actress vidya sawale made reel with her twin daughters watch video | "तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा

"तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा

'लागिर झालं जी' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अज्या आणि शितलीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. 'लागिर झालं जी' मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या मालिकेत पुष्पा मामी हे पात्र साकारून अभिनेत्री विद्या सावळे घराघरात पोहोचली. 'लागिर झालं जी' मालिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. 

या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये विद्या यांनी काम केलं. सध्या त्या 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेत विद्या यांच्याबरोबर त्यांच्या दोन जुळ्या लेकीही झळकल्या आहेत. 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेतून विद्या यांच्या जुळ्या लेकींनी कलाविश्वात पाऊल ठेवलं. त्यांच्या जुळ्या लेकींची नावं नेहा आणि निकिता अशी आहेत. नेहा आणि निकिता कॉन्स्टेबल मंजू मालिकेत सवी आणि कवी या भूमिका साकारत आहेत. 

विद्या आणि त्यांच्या जुळ्या लेकी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक व्हिडिओ आणि फोटोही त्या शेअर करत असतात. आतादेखील त्यांच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विद्या यांनी त्यांच्या जुळ्या लेकींनी भन्नाट रील केला आहे. "तुम दोनो ने मिल के जान मेरी ले ली", यावर विद्या यांनी जुळ्या लेकींसह रील बनवला आहे. या व्हिडिओत नेहा आणि निकिता सेल्फी घेत असल्याचं दिसत आहे. त्यांच्याकडे बघून विद्या हे गाणं म्हणताना दिसत आहेत. 

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "तुमच्या मुली तुमच्यासारख्याच आहेत", "जुळ्या आहेत का", "खूप मस्त" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 
 

Web Title: lagir zal ji fame actress vidya sawale made reel with her twin daughters watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.