OMG!! आमच्या जीवाला धोकायं..., ‘लागीरं झालं जी’ फेम नितीश चव्हाणच्या पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:05 IST2022-01-21T15:04:55+5:302022-01-21T15:05:19+5:30
Lagir Zal Ji, Nitish Chavhan : ‘लागीरं झालं जी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला ‘अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे.

OMG!! आमच्या जीवाला धोकायं..., ‘लागीरं झालं जी’ फेम नितीश चव्हाणच्या पोस्टने खळबळ
‘लागीरं झालं जी’ (Lagir Zal Ji) या मालिकेतील अज्या आठवतो ना? होय, अज्या म्हणजेच नितीश चव्हाण (Nitish Chavhan) . ‘लागीरं झालं जी’ मालिकेने रसिकांचं भरघोस मनोरंजन केलं. या नितीशने साकालेला अज्या फारच भाव खावून गेला. ‘लागीरं झालं जी’ ही मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याला रसिक विसरलेले नाहीत. अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषत: तरुणींमध्ये हिट ठरला.
‘लागीरं झालं जी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला ‘अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. होय, नितीशने शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
होय, नितीशने इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलेली पाहून सर्वच हैराण आहेत.
नितीशने पोस्टसोबत एक फोटो जोडला आहे. या फोटोत तो हातात एक फलक घेऊन उभा आहे. ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकायं’, असं या फलकावर लिहिलेलं आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
या फोटोसोबत नितीशने लिहिलेलं कॅप्शन पाहूनही चाहत्यांना धडकी भरली आहे.
‘ मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशनबद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय,मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवंत पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय,’ असं नितीशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
या पोस्टमध्ये नितीशने मानसी भावलकर हिला टॅग केलं आहे. मानसीनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर अगदी अशीच पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्ही पळून लग्न केलय. घरच्यांचा विरोध असल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे,’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
नितीश चव्हाण व मानसीची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांच्या मते, हा प्रमोशनचा फंडा आहे. पण अद्याप नितीशने याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. साहजिकच या पोस्टमागची कहाणी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.