आसाममध्ये शीतल आणि अजिंक्य असा साजरा करणार गणेशोत्सव !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:10 PM2018-09-10T17:10:10+5:302018-09-10T17:10:18+5:30

सध्या मालिकेत अजिंक्यच पोस्टिंग आसामला झालंय आणि तिथे तो मन लावून त्याचं काम करतोय. शीतली पण आसामला त्याला भेटायला गेली असून तिथल्या सगळ्या लोकांमध्ये मिसळतेय. 

Lagira Zhala Jee Shitli And Ajinkya Ganesh Festival will be celebrated in Assam | आसाममध्ये शीतल आणि अजिंक्य असा साजरा करणार गणेशोत्सव !

आसाममध्ये शीतल आणि अजिंक्य असा साजरा करणार गणेशोत्सव !

googlenewsNext

आसंमतामध्ये बाप्पा मोरयाचा जयघोष घुमू लागलाय... बाप्पाच्या जयजयकारात शीतली आणि अजिंक्यही बाप्पाचरणी नेहमी प्रमाणे नतमस्तक झालेत.‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका  वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. सध्या मालिकेत अजिंक्यच पोस्टिंग आसामला झालंय आणि तिथे तो मन लावून त्याचं काम करतोय. शीतली पण आसामला त्याला भेटायला गेली असून तिथल्या सगळ्या लोकांमध्ये मिसळतेय. 

गणेश चतुर्थीचा सण अगदी जवळ आला आहे पण शीतल आणि अजिंक्य यंदा या उत्सवासाठी घरी नाही आहेत. तरीही हा सण साजरा करण्यात ते दोघेही कुठलीही कमी पडू देणार नाहीयेत. शीतल अजिंक्यला आसाममध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे सुचवते हे प्रेक्षक मालिकेच्या आगामी भागात पाहू शकणार आहेत. अजिंक्य आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शीतल आणि अजिंक्य प्रयत्न करताना दिसणार आहेत. शीतलला उत्सव साजरा करण्याची संधी मिळेल का? शीतल व अजिंक्य तेथील लोकांना आपल्या संस्कृतीच दर्शन कसं करवणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

सोनाली कुलकर्णीने घडवली Eco Friendly बाप्पाची मूर्ती, पाहा त्याचा हा Video

डोळ्यात साठवून ठेवावं असं हे बाप्पाचं रुप... आकर्षक मूर्ती आणि खुद्द सोनालीनेच ही बाप्पाची मूर्ती घडवली म्हटल्यावर त्याची बातच न्यारी. नेहमीप्रमाणे यंदाही सोनालीच्या घरी साजरा होणारा बाप्पाचा उत्सव स्पेशल असणार आहे... विशेष म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ नये याचीच आपण साऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे हे आपण वारंवार ऐकतो मात्र याची सुरूवात खुद्द सोनालीने स्वतःपासूनच केली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने साऱ्या बाप्पा भक्तांना इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करण्याचेही आवाहन केले आहे.

Web Title: Lagira Zhala Jee Shitli And Ajinkya Ganesh Festival will be celebrated in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.