'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 03:31 PM2024-09-29T15:31:03+5:302024-09-29T15:31:53+5:30

अपूर्वा आणि तिच्या आईचा “ती” चा गणपती या लोकमतच्या कार्यक्रमात खास सन्मान झाल्यामुळे अपूर्वाने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (apurva nemlekar)

lagnachi bedi fame actress apurva nemlekar express gratitude to lokmat | 'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना

'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाला आपण विविध मालिकांमधून पाहिलंय. अपूर्वाची रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेल्या शेवंता या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. अपूर्वाला काही दिवसांपूर्वी लोकमतच्या “ती” चा गणपती या पुरस्कार सोहळ्यात खास सन्मान करण्यात आला. हा सत्कार स्वीकारताना अपूर्वाच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली

अपूर्वाच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडली ही खास गोष्ट

अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर लोकमतच्या कार्यक्रमातील आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केलेत. हे पोस्ट करुन अपूर्वा लिहिते, "दिनांक २१ सप्टेंबर २०२४ एक अविस्मरणीय गोष्ट घडली. “ती” चा गणपती या लोकमतच्या कार्यक्रमात माझा सत्कार होणारं होता (माझ्या अभिनय क्षेत्रांतील कामगिरी साठी). आतापर्यंत अनेक पुरस्कार स्वीकारले आणि घरी येऊन आई वडिलांची शाबासकी मिळवली."


अपूर्वा पुढे लिहिते, "परंतु हा असा पहिला पुरस्कार आहे की जो माझ्या आईच्या उपस्थितीत मला मिळाला. माझी आई पहिल्यांदाच एखाद्या पुरस्कार सोहळ्यासाठी हजर राहिली. आणि हीच माझ्यासाठी जग जिंकल्याचा आनंद देणारी गोष्ट आहे. या सोहळ्यात लोकमतने माझ्या आईचाही सत्कार केला. आणि म्हणुनच हा सोहळा माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरला. त्याबद्दल लोकमतचे मनापासून धन्यवाद मानते...!! माझा आणि माझ्या आईचा सत्कार केल्याचा हा क्षण मी कायम माझ्या ह्रदयात जपून ठेवीन..." अशाप्रकारे अपूर्वाने मनातल्या भावना व्यक्त केल्यात.

Web Title: lagnachi bedi fame actress apurva nemlekar express gratitude to lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.